Oxygen crisis : ऑक्सिजन तुटवड्याचा कॅन्टोन्मेंट रुग्णालयाला फटका; नवीन रुग्णांचे अॅडमिशन थांबवले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2021 09:12 PM2021-04-23T21:12:35+5:302021-04-23T21:38:28+5:30
पुणे कॅन्टोन्मेंट रुग्णालयात नवीन ऍडमिशन थांबवल्या. नवीन ऑक्सिजन मिळायला लागतायत तीन दिवस
पुणे : पुण्यातल्या ऑक्सिजन उपलब्धतेचा प्रश्न सुटायला तयार नाहीये. याचा मोठा फटका आता पुणे कॅन्टोन्मेंट मधल्या सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयाला बसला आहे. ऑक्सिजन उपलब्धता अगदी थोडी असल्याने या रुग्णालयाने पेशेंट ने पेशेंट घेणे थांबवले आहे. जोपर्यंत ऑक्सिजन पुरवठ्याची सोय होत नाही तोपर्यंत पेशंट ठेवणं हे धोक्याचे ठरणार असल्याचा दावा कॅन्टोन्मेंटचा अधिकाऱ्यांनी केला आहे.
पुण्यात गेले काही दिवस ऑक्सिजनचा तुटवडा जाणवतो आहे. त्याचाच फटका आता कॅन्टोन्मेंटचा सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयाला बसायला लागला आहे. प्रयत्न करून ही पुरेसा ऑक्सिजन मिळत नसल्यामुळे आता या रुग्णालयाला नवीन रुग्ण घेणं थांबवण्याची वेळ आली आहे. एकीकडे अनेक खासगी रुग्णालयांनी पेशंट घेणं थांबवलेल असताना आता सरकारी रुग्णालयात देखील ही परिस्थिती ओढवली आहे.
पटेल रुग्णालयात पुणे महापालिका आणि कॅंटोन्मेंट चे रुग्ण उपचार घेत आहेत. आयसीयू व्हेंटिलेटर सहीत सुसज्ज असलेले हे रुग्णालय मोठा आधार ठरला होता. मात्र आता ऑक्सिजन चा तुटवड्याचा मोठा फटका या रुग्णालयाला बसलेला दिसतो आहे.
'लोकमत' शी बोलताना कॅन्टोन्मेंट चे सीईओ अमित कुमार म्हणाले " ऑक्सिजन पुरवठा पुरेसा होत नाहीये. तीन दिवसांपूर्वी नगर ला पाठवलेला ऑक्सिजन टँकर आता भरून येत आहे. सध्या चा परिस्थिती मध्ये रिस्क घेणं शक्य नाहीये. त्यामुळे सध्या जेवढे रुग्ण आहेत त्यांच्यावरच उपचार करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे.ऑक्सिजन पुरवठ्यासाठी आम्ही सोय करत आहोत. मात्र तोपर्यंत नवीन पेशंट घेणं थांबवण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे."