मंचर मध्ये पावचासा तडाखा रब्बी भुईसपाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:12 AM2021-03-23T04:12:47+5:302021-03-23T04:12:47+5:30
रविवारी दुपारनंतर पावसाचे वातावरण झाले होते. आकाशात ढग जमून आले होते. सायंकाळी विजांच्या कडकडाटासह दमदार पाऊस कोसळला. यावेळी जोरदार ...
रविवारी दुपारनंतर पावसाचे वातावरण झाले होते. आकाशात ढग जमून आले होते. सायंकाळी विजांच्या कडकडाटासह दमदार पाऊस कोसळला. यावेळी जोरदार वारे वाहत होते. हा पाऊस वळवा सारखा कोसळला आहे. पावसाने पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. रब्बी हंगामातील गहू पीक जोमदार आले आहे. जोरदार पाऊस व वेगवान वारे यामुळे अनेक ठिकाणी गहू पीक भूईसपाट झालेले दिसले. कांदा पिकाला फटका बसला आहे. परिसरातील शेतकरी दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात करतात. त्यांनी शेतामध्ये जनावरांचा चारा पीक घेतले आहे. पावसाच्या तडाख्यातून हे चारा पीक सुटले नाही. कडवळ, गवत,ज्वारी ही उभी पिके शेतात आडवी झाली आहे. पावसाचा तडाखा नगदी पिकांनाही बसला आहे. दरम्यान अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. साठवून ठेवलेला सुका चारा पावसापासून संरक्षण करण्यासाठी त्यावर प्लास्टिक कागद टाकण्याची धावपळ उडाली होती. काही शेतकऱ्यांचा सुका चारा भिजला आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे दरवर्षी शेतकर्यांना फटका बसत आहे. मार्च महिन्यात अवकाळी पाऊस पडू लागल्याने शेतकरी काहीसा चिंतेत पडला आहे. या पावसाने सखल भागात पाणी साचले होते. रस्त्यावरून पावसाचे पाणी वाहत होते. पाऊस पडून गेल्यानंतर हवेत गारवा निर्माण झाला होता. दरम्यान सोमवारी सायंकाळी पावसाचे वातावरण झाले होते .मेघगर्जनेसह पावसाने तुरळक हजेरी लावली.
--
फोटो २२ मंचर अवकाळी पाऊस
फोटोखाली: अवकाळी पावसाने अनेक शेतकऱ्यांचे गहू पीक,जनावराचा चारा भुईसपाट झाले आहे.