संकुलामुळे भोरमधील व्यापाराला चालना मिळेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:08 AM2021-06-06T04:08:21+5:302021-06-06T04:08:21+5:30

भोर : येथील बसस्थानकात नवीन सुसज्ज असे व्यापारी संकुल उभारण्यात येणार आहे. यामुळे भोरच्या व्यापाराला चालना मिळेल, असे ...

The package will boost morning trade | संकुलामुळे भोरमधील व्यापाराला चालना मिळेल

संकुलामुळे भोरमधील व्यापाराला चालना मिळेल

Next

भोर : येथील बसस्थानकात नवीन सुसज्ज असे व्यापारी संकुल उभारण्यात येणार आहे. यामुळे भोरच्या व्यापाराला चालना मिळेल, असे प्रतिपादन आमदार संग्राम थाेपटे यांनी केले.

आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते नवीन व्यापारी संकुल व गॅस शवदाहिनीचे भूमिपूजन झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष निर्मला आवारे, उपनगराध्यक्ष अमित सागळे, गटनेते सचिन हर्णसकर, डाॅ. विजयकुमार थोरात, अभिजित सोनावले, विठ्ठल आवाळे, कृष्णा शिनगारे, राजेश काळे, अनिल सावले, तृप्ती किरवे, सुमंत शेटे, आशा रोमण, अमृता बहिरट, आशा शिंदे, रूपाली कांबळे, वृषाली मोहिते, सोनम मोहिते, स्नेहा पवार, गणेश पवार, देविदास गायकवाड, अनिल पवार, चंद्रकांत मळेकर, समीर सागळे, सादिक फरास, वृषाली घोरपडे, जगदीश किरवे, अभिषेक येलगुडे उपस्थित होते.

नवीन व्यापारी संकुलासाठी आमदार संग्राम थोपटे यांच्या विशेष प्रयत्नाने वैशिष्ट्यपूर्ण आणि नगरोत्थान योजनेतून सुमारे १० कोटी मंजूर झाले आहे. तर पहिल्या दोन टप्यासाठी साडेचार कोटी रु. मंजूर झाले आहेत. सदर संकुलात ७६ हजार स्क्वेअर फुटांचे बांधकाम असून १६ हजार स्क्वेअर फुटांचे पार्किंग आहे. त्यात ६० दुकान गाळे व २१ ऑफिस असे ८१ गाळे असून सांस्कृतिक हाॅल तसेच महिला व पुरुष यांच्यासाठी स्वतंत्र स्वच्छतागृह असणार आहे.

आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते भूमिपूजन झाले असून लवकरच कामाला सुुरुवात होणार असल्याचे नगराध्यक्ष निर्मला आवारे व उपनगराध्यक्ष अमित सागळे यांनी सांगितले.

०५ भोर

व्यापारी संकुल इमारतीचे भूमिपूजन करताना आमदार संग्राम थोपटे यांच्यासमवेत नगराध्यक्षा निर्मला आवारे व इतर.

Web Title: The package will boost morning trade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.