वडगावशेरी-कल्याणीनगरमध्ये बंदिस्त पदपथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 07:20 PM2018-04-16T19:20:40+5:302018-04-16T19:20:40+5:30
पुणे शहराच्या सौंदर्यामध्ये यामुळे भर पडणार असून पुणे शहर स्मार्ट सिटीकडे वाटचाल करत असताना ही उत्कृष्ट संकल्पना साकारण्यात आली आहे.
चंदननगर : परदेशाप्रमाणे आपल्या देशात पहिल्यांदाच बंदिस्त पदपथ कल्याणीनगर येथे तयार करण्यात आला आहे. आमदार जगदीश मुळीक यांच्या यांच्या संकल्पनेतून हा पदपथ तयार करण्यात आला आहे. या पदपथाचे लोकार्पण नुकतेच करण्यात आले. याप्रसंगी स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक, संदीप जऱ्हाड, सुनिता गलांडे, शीतल शिंदे यांच्यासह मारुती गलांडे, ज्ञानेश्वर शिंदे उपस्थित होते.
पादचाऱ्यांना ऊन, वारा, पाउस यापासून बचाव होण्यासाठी या पदपथाचा फायदा होणार आहे, असे आमदार जगदीश मुळीक यांनी सांगितले. बंदिस्त पदपथामुळे पद्पाथातून गाड्या चालविणे, गाड्या पार्किंग करणे थांबणार आहे. याशिवाय नागरिकांना सुरक्षितपणे चालता येणार आहे. पुणे शहराच्या सौंदर्यामध्ये यामुळे भर पडणार असून पुणे शहर स्मार्ट सिटीकडे वाटचाल करत असताना ही उत्कृष्ट संकल्पना साकारण्यात आली आहे. तसेच पुढील काळात संपूर्ण शहरात सर्वांची मते घेऊन ही संकल्पना करणार असल्याचे स्थायीचे अध्यक्ष योगेश मुळीक यांनी सांगितले. कडाक्याच्या उन्हामुळे बंदिस्त पदपथामध्ये पादचारी काही वेळ याठिकाणी थांबून विश्रांती घेऊन जात आहे व या नवीन संकल्पनेचे कौतुक करीत आहे.
पुणे शहरातील पहिला बंदीस्थ पदपथ असुन तो पादचाऱ्यांचे ऊन, वारा, पावसापासून संरक्षण व्हावे. या उद्देशाने तयार करण्यात आला आहे.
- जगदीश तुकाराम मुळीक, आमदार, वडगावशेरी