पुण्यातील डोंजे येथे सिंहगड पायथ्याजवळ शेतकऱ्याने भात रांगोळीतून साकारला दुर्मिळ पक्षी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 07:31 PM2021-09-07T19:31:08+5:302021-09-07T19:31:15+5:30

पक्षी सह्याद्रीच्या सदाहरित जंगलात दिसतो

Paddy Rangoli made by Shrikant Ingalhalikar at Donje in Pune ... | पुण्यातील डोंजे येथे सिंहगड पायथ्याजवळ शेतकऱ्याने भात रांगोळीतून साकारला दुर्मिळ पक्षी...

पुण्यातील डोंजे येथे सिंहगड पायथ्याजवळ शेतकऱ्याने भात रांगोळीतून साकारला दुर्मिळ पक्षी...

googlenewsNext
ठळक मुद्देभात शेतीतले परंपरागत हस्तकौशल्य सध्याच्या यांत्रिकीकरणाच्या युगात जोपासणे हा या चित्रांचा उद्देश

पुणे : पुण्यातील डोणजे येथे सिंहगड पायथ्याजवळ श्रीकांत इंगळहळीकर यांनी भातरोपातून  'जेरडन्स लीफबर्ड' या दुर्मिळ पक्ष्याचे चित्र केले आहे. शेतात वेगवेगळी रंगीत पाने असलेल्या भातरोपांची हाताने लावणी करून प्रचंड मोठी चित्रे निर्माण करण्याची अवघड कला जपानी शेतक-यांनी गेली २८ वर्षे जोपासली आहे. ही कला ५ वर्षांपूर्वी सिंहगड पायथ्याच्या शेतात भारतात सर्वप्रथम विकसित केली.

हा पक्षी सह्याद्रीच्या सदाहरित जंगलात दिसतो. हिरव्या रंगामुळे तो शोधणे अवघड असते. आवाजावरूनच तो शोधावा लागतो.गेल्या वर्षी लहरी पावसामुळे भातरांगोळी करता आली नव्हती. या वर्षी मात्र एकाच हंगामात दोन चित्रे हा प्रयोग यशस्वी झाला.

भात शेतीतले परंपरागत हस्तकौशल्य सध्याच्या यांत्रिकीकरणाच्या युगात जोपासणे हा या चित्रांचा उद्देश आहे. सह्याद्रीतले दुर्मिळ वन्य प्राणी पक्षी या कलेतून सादर केले आहेत. यावर्षी प्रथमच पेरणीतून आणि लावणीतून अशी दोन वेगवेगळी चित्रे सादर झाली आहेत. जून महिन्यात दोन प्रकारच्या भाताचे बियाणे पेरून गव्याचे चित्र तयार केले होते. त्यानंतर ही दोन प्रकारची भातरोपे दोन महिने वाढल्यानंतर ऑगस्ट महिन्यात ती रोपे चिखलात लावणी करून 'जेरडन्स लीफबर्ड' या दुर्मिळ पक्ष्याचे चित्र केले आहे. 

Web Title: Paddy Rangoli made by Shrikant Ingalhalikar at Donje in Pune ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.