पडवी ग्रामपंचायतीत कुल समर्थक शितोळे यांना एकहाती सत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:11 AM2021-01-23T04:11:09+5:302021-01-23T04:11:09+5:30
शितोळे यांच्याविरोधात गावामध्ये कुल- थोरात गट एकत्र झाला होता. यामध्ये सेवानिवृत्त अधिकारी भरत शितोळे, मानसिंग शितोळे, अजित शितोळे, दत्तात्रय ...
शितोळे यांच्याविरोधात गावामध्ये कुल- थोरात गट एकत्र झाला होता. यामध्ये सेवानिवृत्त अधिकारी भरत शितोळे, मानसिंग शितोळे, अजित शितोळे, दत्तात्रय शितोळे, संदीप शितोळे आदी दिग्गजांचा समावेश होता. शितोळे यांच्या दावल मलिक ग्रामविकास पॅनलला अकरा पैकी दहा जागा मिळाल्या. तर विरोधी पॅनलला एका जागेवर समाधान मानावे लागले. लक्षवेधी लढतीमध्ये राजेंद्र शितोळे यांनी बाजार समितीचे संचालक महेंद्र शितोळे यांचा ७९ मतांनी, प्रमोद शितोळे यांनी लहू गायकवाड यांचा १७९ मतांनी, अनिल शितोळे यांनी राष्ट्रवादी युवकचे जिल्हा उपाध्यक्ष अजित शितोळे यांचा १३० मतांनी तर उर्मिला गायकवाड यांनी अनुजा अनिल शितोळे यांचा ९५ मतांनी पराभव केला.
विजयानंतर राजेंद्र शितोळे म्हणाले की, विजय समस्त पडवीकरांना समर्पित करतो.आमदार राहुल कुल यांच्या नेतृत्वाखाली सरपंच म्हणून गेली पाच वर्षांमध्ये ४५ कोटी रुपयांची कामे केली त्यामुळे जनतेने मला निवडून दिले आहे.
प्रमुख विजयी उमेदवार: प्रमोद शितोळे ,उर्मिला गायकवाड, माधुरी बारवकर, अनिल शितोळे, शुभांगी चव्हाण ,जयश्री कुदळे (बिनविरोध) नागेश मोरे ,राजेंद्र शितोळे, गणेश बारवकर ,मंजुषा जगताप, शितल शितोळे.
२२ केडगाव
पडवी येथे विजयानंतर राजेंद्र शितोळे यांना खांद्यावर घेऊन जल्लोष करताना ग्रामस्थ.