कोरोनाबाधित रूग्णांचा पाडवा केला गोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:10 AM2021-04-14T04:10:54+5:302021-04-14T04:10:54+5:30

पुणे : खराडीतील महानगरपालिकेच्या कोविड सेंटरमधील रूग्णांना साजुक तुपातली पुरणपोळी आणि आमरसाचं जेवण देऊन त्यांचा पाडवा गोड करण्यात ...

Padwa made sweet for coronary patients | कोरोनाबाधित रूग्णांचा पाडवा केला गोड

कोरोनाबाधित रूग्णांचा पाडवा केला गोड

Next

पुणे : खराडीतील महानगरपालिकेच्या कोविड सेंटरमधील रूग्णांना साजुक तुपातली पुरणपोळी आणि आमरसाचं जेवण देऊन त्यांचा पाडवा गोड करण्यात आला.

खराडीतील तरुण वेदांत शिंदे आणि साहील शिरसाठ यांनी हा उपक्रमराबविला. खराडी, चंदननगर भागात गेल्या काहीं दिवसापासून शहराच्या तुनलेत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. त्यामुळे या परिसरात भीतीचे वातावरणात पसरले आहे. लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार पुन्हा खराडीतील रक्षकनगर येथील जलतरण तलावातील कोविड सेंटर सुरू केले आहे. घरातील व्यक्ती कोरोना बाधित असल्याने पाडवा आनंदाने साजरा कसा करावा. असा प्रश्न रुग्णांच्या नातेवाईकांना पडला. मात्र, या तरुणांनी पुढे येत तुम्ही घरी आनंदाने पाडवा साजरा करा. तुमच्या कोरोना बाधित व्यक्तींला देखील पाडव्याच्या गोडवा पुरणपोळीनी साजरा करता येईल. असे सांगत त्यांनी पुढाकार घेऊन कोरोना बधितांचा पाडावा गोड केला.

कोविडमध्ये संपूर्ण देश राज्य आणि विशेषत: पुणेकर होरपळून निघाले आहेत. बेड्सचा औषधांचा तुटवड्याने हैरान असताना नववर्षाच्या पहिल्या सणाला सुद्धा अनेकजण कोविड सेंटरमध्ये दाखल झाले आहेत. तसेच इतर गरीब परिवार व मजुरांनाही यावेळी पुरणपोळीचं जेवन देण्यात आले, असे शिंदे यांनी सांगितले.

Web Title: Padwa made sweet for coronary patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.