पेट्रोलचोरी ५ हजारांत शुद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 06:19 AM2017-07-29T06:19:08+5:302017-07-29T06:19:10+5:30

वैधमापनशास्त्र विभागाच्या नियमानुसार पेट्रोलचोरी करणारा पंपचालक आणि पेट्रोल वितरण यंत्राची तपासणी करून न घेणारा असे दोघेही केवळ २ ते ५ हजार रुपयांच्या दंडाचे धनी आहेत.

paetaraolacaorai-5-hajaaraanta-saudadha | पेट्रोलचोरी ५ हजारांत शुद्ध

पेट्रोलचोरी ५ हजारांत शुद्ध

Next

विशाल शिर्के
पुणे : वैधमापनशास्त्र विभागाच्या नियमानुसार पेट्रोलचोरी करणारा पंपचालक आणि पेट्रोल वितरण यंत्राची तपासणी करून न घेणारा असे दोघेही केवळ २ ते ५ हजार रुपयांच्या दंडाचे धनी आहेत. त्यामुळे चोरही दंड भरुन शुद्ध होत असल्याचे चित्र निर्माण झाले असून, किरकोळ दंडामुळे पेट्रोल - डिझेल यंत्रणेची तपासणी करून घेण्यातही दिरंगाई केली जात असल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले आहे.
देशासह राज्यात विविध ठिकाणी पेट्रोल पंपावर इलेक्ट्रॉनिक चिपच्या माध्यमातून पेट्रोल-डिझेल चोरी होत असल्याच्या घटना नुकत्याच उघडकीस आल्या आहेत. राज्याच्या वजनमापे विभागाच्या माध्यमातून या पंपातील यंत्र प्रमाणित केले जाते. तसेच, वजनमापे विभागाला पेट्रोलपंपावर तपासणी करण्याचे देखील अधिकार आहेत. मात्र, वैधमापन शास्त्र विभागाच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात २०१३ पासून केवळ एकाच पंपावर पेट्रोल कमी प्रमाणात दिले गेल्याचे स्पष्ट झाले आहे. तर ११४ पंपचालकांनी वेळेत पेट्रोल पंपांच्या यंत्राची वैधमापन विभागाकडून तपासणी केली नसल्याची माहिती समोर आले आहे. माहिती अधिकार चळवळीतील कार्यकर्ते अझहर खान यांनी माहिती अधिकारात ही बाब उघड केली आहे. पेट्रोल पंपांच्या पुढे भाजी विक्रेते आणि आठवडी बाजारातील विक्रेते सर्वाधिक प्रमाणात वजनमापांचे प्रमाणीकरण करीत नसल्याचे आकडेवारी सांगते. पेट्रोलच्या चोरीचे प्रकरण असो, की मिठाई आणि भाजीपाल्याच्या वजनातील चोरी, अशा बाबी या दंडावरच निभावण्यात आल्या आहेत. जास्तीत जास्त हा दंड ५ हजार रुपये असल्याने मापातील पाप करणाºयांवर वचक बसत नसल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे.

कमी प्रमाणात वस्तूंचे वितरण केल्यास जास्तीत जास्त ५ हजार रुपये दंडाची शिक्षा आहे. एखाद्या व्यक्तीने दंड न भरल्यास त्याच्यावर खटला दाखल केला जातो. वजन-मापांचे प्रमाणीकरण न केल्यास, पॅकेज वस्तूंवर संबंधित कंपनीचा नाव पत्ता नसेल, पॅकेज कधी केले याचा उल्लेख नसल्यास संबंधितांवर कारवाई केली जाते. अशा प्रकरणांत २ हजार रुपयांचा दंड आकारला जातो.
- ध. ल. कोवे, उपनियंत्रक, वैधमापन शास्त्र, पुणे विभाग

Web Title: paetaraolacaorai-5-hajaaraanta-saudadha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.