पाटण खोऱ्यात पाण्यासाठी पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 02:28 AM2018-05-27T02:28:01+5:302018-05-27T02:28:01+5:30

आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर परिसरामध्ये असणाºया पाटण खोºयासाठी वरदान ठरलेल्या डिंभे धरणाचे पाणलोट क्षेत्र यावर्षी झपाट्याने रिकामे झाले आहे.

 Pahut in the valley of Patan | पाटण खोऱ्यात पाण्यासाठी पायपीट

पाटण खोऱ्यात पाण्यासाठी पायपीट

Next

तळेघर - आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर परिसरामध्ये असणाºया पाटण खोºयासाठी वरदान ठरलेल्या डिंभे धरणाचे पाणलोट क्षेत्र यावर्षी झपाट्याने रिकामे झाले आहे.
तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील पाटण खोºयासाठी वरदान ठरलेल्या डिंभे धरणाचे पाणलोट क्षेत्र हे यावर्षी या भागामधील भीमाशंकर, पाटण व आहुपे या खोºयामध्ये मुसळधार पडणाºया पावसामुळे तुडुंब भरून वाहत होते. यामुळे या परिसरातील पाटण, म्हाळुंगे, कुशिरे खु., कुशिरे बु., मेघोली, दिगद, बेंढारवाडी ही गावे ओलिताखाली येऊन या भागातील आदिवासी शेतकरी हा उपसासिंचनाद्धारे मोठ्या प्रमाणात रब्बी पिके घेऊ लागला. या पाणलोटक्षेत्रातून पाणीउपसा करून बाजरी, गहू, बटाटे, कांदे, मेथी, कोथिंबीर यांसारखी पिके मोठ्या प्रमाणात घेऊ लागला. परंतु जसजशी उन्हाळ्याची तीव्रता वाढली असून तसतशी डिंभे धरणातील पाण्याची पातळी कमी होऊ लागली आहे.
तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील पाटण खो-यामध्ये असणा-या सावरली, साकेरी,नानवडे, ढकेवाडी या गावांच्या अत्यंत हाकेच्या अंतरावर डिंभे धरण असुन या आदिवासींना पाण्यासाठी वणवण करत दुष्काळाचे हाल सोसावे लागत आहे. या गावांना मोठ्या प्रमाणात दुष्काळाशी सामना करावा लागत आहे.

डिंभे धरणाचे पाणलोट क्षेत्र झाले झपाट्याने रिकामे

४पाटण व आहुपे हा परिसर मुसळधार पडणाºया पावसाचे माहेरघर समजले जाते. चार महिने मुसळधार पाऊस पडूनही उन्हाळ्यामध्ये या भागातील आदिवासी जनतेला पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. वर्षानुवर्षे या भागातील आदिवासींना दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत.
४या भागातील विहिरी, शिवकालीन खडकातील टाक्या, बुडीत बंधारे, तळी, डवरी, इत्यादी उपलब्ध असणारे जलस्रोत पावसाळ्यामध्ये तुडुंब भरतात, परंतु उन्हाळ्यामध्ये या जलस्रोतांमध्ये पाण्याचा थेंबही राहिला नाही.
४त्याचप्रमाणे या पाणलोटक्षेत्रामध्ये पाटण, पिंपरी व पिंपरी, म्हाळुंगे हद्दीमध्ये छोट्या छोट्या कोल्हापुरी पद्धतीने बंधारे बांधून पाणी अडविले जात आहे. त्या कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाºयातून उपसासिंचन करुन या भागामध्ये बागायत पद्धतीची शेती केली जात होती.
४परंतु यावर्षी डिंभे धरणातुन वारंवार पुर्व भागासाठी कालव्याद्धारे मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जात असल्यामुळे डिंभे धरणातील पाणीसाठा कमी होवु लागला आहे.

Web Title:  Pahut in the valley of Patan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.