पाच लाख दिले अन् BMW घेतली, उर्वरित पैसे देण्यास टाळाटाळ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2022 10:37 AM2022-12-01T10:37:23+5:302022-12-01T10:37:37+5:30

टोकन अमाऊंट म्हणून त्यांच्याकडून पाच लाख रुपये घेतले आणि बीएमडब्ल्यू कार घेऊन गेला

Paid five lakhs and bought a BMW refused to pay the rest | पाच लाख दिले अन् BMW घेतली, उर्वरित पैसे देण्यास टाळाटाळ

पाच लाख दिले अन् BMW घेतली, उर्वरित पैसे देण्यास टाळाटाळ

googlenewsNext

पुणे: मुंढवा परिसरात एक खळबळजनक प्रकार घडला आहे. जुनी बीएमडब्ल्यू विकत घेण्यासाठी पाच लाख रुपयांचं टोकन अमाऊंट देऊन उर्वरित पैसे देण्यासाठी ताटा करणाऱ्या एका व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. नितीन हरी वाटवे (रा. नांदेड सिटी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी प्रकाश गोविंद पिंगळे यांनी तक्रार दिली आहे. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी हे एका व्यक्तीकडे सिक्युरिटी ऑफिसर म्हणून काम करतात. दरम्यान फिर्यादी यांच्या बॉसला 35 लाख रुपयांची गरज होती. त्यामुळे त्यांनी फिर्यादीला बीएमडब्ल्यूकार विकून पैशाची व्यवस्था होते का असे पाहण्यास सांगितले. त्यामुळे फिर्यादीने नितीन वाटवे यांच्यासोबत बीएमडब्ल्यू कारचा व्यवहार केला. टोकन अमाऊंट म्हणून त्यांच्याकडून पाच लाख रुपये घेतले आणि बीएमडब्ल्यू कार घेऊन गेला. मात्र उर्वरित पैसे देण्यास त्याने टाळाटाळ केली. एप्रिल 2021 पासून त्याने पैसे देण्यास टाळाटाळ केल्याने फिर्यादी यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार मुलगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Paid five lakhs and bought a BMW refused to pay the rest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.