चित्रांतून मुंबई हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली
By Admin | Published: November 27, 2015 01:44 AM2015-11-27T01:44:52+5:302015-11-27T01:44:52+5:30
२६/११च्या दहशतवादी हल्ल्याचा थरार...प्राणाची बाजी लावून अहोरात्र लढणारे सैनिक.. अखंड तेवणारी क्रांतीची मशाल... प्राणाची आहुती देऊन अतिरेक्यांना पराभूत करणारे सैनिक...
पुणे : २६/११च्या दहशतवादी हल्ल्याचा थरार...प्राणाची बाजी लावून अहोरात्र लढणारे सैनिक.. अखंड तेवणारी क्रांतीची मशाल... प्राणाची आहुती देऊन अतिरेक्यांना पराभूत करणारे सैनिक... आणि स्वतंत्र भारताची साक्ष देणारा तिरंगा, असे विविध चित्र कॅनव्हासवर रेखाटत विद्यार्थ्यांनी मुंबईमध्ये २६/११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना मानवंदना दिली.
मुंबईत २६/११ रोजी झालेल्या हल्ल्यातील शहिदांच्या स्मरणार्थ पुणे शहर पोलीस (गुन्हे विभाग) व शुक्रवार पेठेतील सेवा मित्रमंडळ ट्रस्टतर्फे जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी अप्पर पोलीस आयुक्त चंद्रशेखर दैठणकर, ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर, माजी आमदार मोहन जोशी, परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त तुषार दोशी, परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त राम पठारे, खडक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रघुनाथ जाधव, अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे विभागाचे सी. एच. वाकडे या वेळी उपस्थित होते.
तेंडुलकर म्हणाले की, दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी देशासाठी काम केले पाहिजे. विद्यार्थी हेच आपल्या देशाचे भविष्य आहेत. त्यामुळे शहिदांच्या स्मृती आणि चांगले विचार विद्यार्थ्यांनी रुजविले पाहिजेत. या चांगल्या विचारातूनच पुढची पिढी घडणार आहे. देशासाठी योगदान देणारे तरुण, पर्यावरण जनजागृती, वाहतूक समस्या, धूम्रपान-एक शाप अशा विविध विषयांवर मुलांनी चित्रे रेखाटली. मंगेश तेंडुलकर यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. अहमदनगरच्या अक्षय वैद्य याला विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले. या वेळी आर्यन स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले. तन्मय तोडमल, प्रशांत जाधव, विक्रांत मोहिते, उमेश कांबळे, अजय पंडित यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. विवेक खटावकर, जयंत टोले, संदीप गायकवाड, नितीन होले यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. डॉ. मिलिंद भोई यांनी सूत्रसंचालन केले.
निकाल : अ गट : पहिली ते दुसरी : प्रथम : नम्रता इंगळे (यशोदीप विद्यालय वारजे), द्वितीय : भाग्यश्री चौधरी (मिकिज हायस्कूल, बिबवेवाडी), तृतीय : नंदनी वानगरी (प्रकाश इंग्लिश मीडियम स्कूल), उत्तेजनार्थ : ऋतूजा संघवी, चेताली राठोड (विजय वल्लभ स्कूल), ब गट: तिसरी ते चौथी प्रथम, जानिल जैन, द्वितीय : निधाफातीमा शेख, तृतीय : अन्सारी जलालउद्दीन, उत्तेजनाथ : नितीन सोनी, नित्याय होले, क गट: पाचवी ते सातवी, प्रथम : श्रुती खडके, द्वितीय :पूर्वा गवळी, तृतीय : नम्रता पाटील, उत्तेजनार्थ : स्वानंद शेट्ये, सायली येनपूरे, ड गट : आठवी ते दहावी प्रथम : ओंकार सोनवणे, द्वितीय : अनिशा माने, तृतीय : खुशी हिंगे, उत्तेजनार्थ: विघ्नेश सूरा, तनिष्का गंधाल, खुला गट : प्रथम : रिभीता सुरेश डे, द्वितीय : प्रसाद कोळंबेकर, तृतीय शुभंकर अंबिके.