'पैसे मांगेगा तो तुझे जान से मार दूंगा', पुण्यात पाणीपुरी विक्रेत्याला मारहाण, दीड हजार काढून घेतले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2022 01:09 PM2022-08-14T13:09:44+5:302022-08-14T13:09:54+5:30
लाकडी बांबु डोक्यात, उजवे हातावर, डोक्यावर, तोंडावर व पायावर मारुन जखमीही केले
लोणी काळभोर : पाणीपुरीचे पैसे मागितल्याचा कारणांवरून मला ओळखत नाहीस का? माझे नाव आप्पा लोंढे आहे. मी येथील भाई आहे. पैसे मागितले तर जिवे ठार मारील. अशी धमकी देऊन परप्रांतीयास शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी मारहाण करून लाकडी बांबुने डोक्यात, उजवे हातावर, तोंडावर व डावे पायावर मारहाण करुन जखमी केले. व पाणीपुरीच्या गाडीच्या गल्ल्यातील १ हजार ५०० रुपये जबरदस्तीने काढून घेतलेल्या तिघांना पोलिसांनी जेरबंद केले आहे.
याप्रकरणी अनिल सुरेश राठोड (वय 32 वर्ष धंदा पाणीपुरी व्यवसाय रा. बगाडे मळा, ऊरुळी कांचन) यांनी दिलेल्या फिर्यादी वरून वैभव तरंगे (रा दत्तवाडी उरूळी कांचन), तुषार अनिल अडागळे व प्रताप बाळु लोंढे (दोघे रा. गोळेवस्ती ऊरुळी कांचन) यांना अटक करण्यात आली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर प्रकार १३ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारांस घडला. राठोड हे दत्तवाडी ऊरुळी कांचन येथे पाणीपुरीचा गाडा लावून पाणीपुरी विक्री करत होते. त्यावेळी तिघे तेथे आले. त्यांनी पाणीपुरी खाल्ली व तेथुन निघुन जात होते. तेव्हा राठोड यांनी त्यांना पैसे मागितले. तेव्हा तरंगे याने तु मुझे पेहचानता नही क्या? मेरा नाम आप्पा लोंढे है मैं यहा का भाई हैं बाद मे अगर कभी पैसे मांगेगा तो तुझे जान से मार दूंगा. अशी धमकी दिली. व शिवीगाळ केली करत हाताने मारहाण केली. तर दुस-याने तेथे पडलेला लाकडी बांबु डोक्यात, उजवे हातावर, डोक्यावर, तोंडावर व पायावर मारुन जखमी केले. तर एकाने पाणीपुरीच्या गाडीच्या गल्यामध्ये हात घालून त्यातु दिवसभराचा गल्ला १ हजार ५०० रुपये जबरदस्तीने काढुन घेतले. त्यानंतर त्या सर्वांनी मिळुन पाणीपुरीच्या गाड्याची लाकडी बांबुने तोडफोड करुन नुकसान करुन त्यांचे मोटारसायकल वरुन निघुन गेले.