रस्त्यावरची भजी खाताय? तर मग नक्की 'ही' बातमी वाचा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2021 03:19 PM2021-12-14T15:19:02+5:302021-12-14T18:20:38+5:30

पुणे : खाद्यतेलाचा पुन्हा पुन्हा वापर आरोग्याला अपायकारक असतो. रस्त्यावर मिळणारे भजे चविष्ट असतात; पण तेलाचा पुनर्वापर घातक असतो. ...

pakoda bhaji on the street food recipe disadvantage | रस्त्यावरची भजी खाताय? तर मग नक्की 'ही' बातमी वाचा

रस्त्यावरची भजी खाताय? तर मग नक्की 'ही' बातमी वाचा

googlenewsNext

पुणे : खाद्यतेलाचा पुन्हा पुन्हा वापर आरोग्याला अपायकारक असतो. रस्त्यावर मिळणारे भजे चविष्ट असतात; पण तेलाचा पुनर्वापर घातक असतो. हॉटेलचालकांनी असे केल्यास अन्न व औषध प्रशासनातर्फे दंडात्मक कारवाई केली जाते. यंदाच्या वर्षात १६ हॉटेलचालकांकडून तेलाचे नमुने घेण्यात आले होते. अन्न औषध प्रशासनाने ते कमिटीकडे तपासणीस पाठवले आहेत. त्यांचा अहवाल अद्याप आलेला नाही. त्यामुळे यंदा एकाही हॉटेलचालकावर कारवाई करण्यात आलेली नाही, असे अन्न व औषध प्रशासन विभागाचे नोडल अधिकारी अरुण भुजबळ यांनी सांगितले.

तेल तळण्यासाठी स्टेनलेस स्टीलचेच भांडे हवे

सर्व प्रकारच्या धातूंनी किंवा मिश्र धातूंचा उपयोग करून भांडी बनविली जातात. पण हे सर्वच धातू अन्न शिजविण्याच्या दृष्टीने सुरक्षित असतीलच असे नाही. त्यामुळे अन्न शिजविण्यासाठी सर्वसामान्यपणे वापरली जाणरी स्टेनलेस स्टीलची भांडी विविध धातूंच्या मिश्रणाने बनविली जात असतात. अन्न शिजविण्याच्या दृष्टीने सर्वोत्तम समजली जातात. ‘१०’ हा आकडा दहा टक्के प्रमाण निकेल या धातूचे दर्शवितो. या धातूमुळे भांड्याला चमक मिळते, तर ‘अठरा’ हा आकडा अठरा टक्के क्रोमियम धातू दर्शवितो. या धातूमुळे भांड्याला गंज लागत नाही. ही भांडी अन्न शिजविण्याच्या दृष्टीने सुरक्षित समजली जातात.

तेलसाठ्याची नोंद ठेवतो कोण?

रोज ५० लीटरपेक्षा अधिक वापर असलेल्या हॉटेलचालकांनी दररोज साठ्याची नोंद ठेवणे बंधनकारक आहे. मात्र, पुणे शहरात अशा प्रकारची गांभीर्यपूर्वक कोणतीही हॉटेल अथवा कोणत्याही गाड्यावर ठेवली जात नाही.

वर्षभरात एकावरही कारवाई नाही

पुणे शहरात वर्षभरात १६ हॉटेलांकडून तपासणीसाठी नमुने घेतले होते. अन्न व औषध प्रशासनाने रुका समितीकडे ते पाठवले आहेत. त्यांचे अहवाल अद्याप आलेले नाही. त्यामुळे त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची एकाही हॉटेलचालकांवर कारवाई करण्यात आलेली नाही.

..तर होऊ शकतात हे आजार

सूर्यफुलाचे किंवा कॉर्न ऑइल किंवा इतर कुठलेही खाद्यतेल जर आपण परत परत तळले तर त्याच्यामध्ये अलडीहाइड्स नावाचे काही विषारी पदार्थ तयार होतात. हे पदार्थ वेगवेगळ्या आजारांना आमंत्रण देतात. जसे की हृदयविकार, कर्करोग, अल्झायमर, डिमेन्शिया, पार्किन्सन्स डिसिज इत्यादी. अजूनही काही पदार्थ बाहेर निघतात ज्याला फोर हैद्रॉक्सी ट्रान्स नॉमिनल असे म्हणतात आणि त्याचा परिणाम आपल्या डीएनए आणि आरएमए यांच्यावर होऊ शकतो. तसेच तेल परत परत तळत असल्यामुळे त्याच्यामध्ये रासायनिक घटक बदलायला लागतात तसे ते त्यांचेदेखील होऊ शकते. त्याचबरोबर त्याच्या चवीवरदेखील परिणाम होऊ लागतो. ट्रान्स फॅट्सचे प्रमाण वाढते. त्यामुळे रक्तातील एलडीएल नावाचे वाईट कोलेस्ट्रॉलदेखील वाढू शकते.

- अर्चना रायरीकर, आहारतज्ज्ञ

तळलेले तेल बायोडिझेल कंपन्यांना द्या, पैसा मिळवा

वापरलेले तेल बायोडिझेल कंपन्यांना दिल्यास त्याचे पैसे मिळतात. मात्र, त्याचा दर अत्यंत कमी असताे. प्रत्येक कंपनीचे दर वेगवेगळे असतात. साधारणपणे बायोडिझेल कंपन्या या हॉटेलचालकांना प्रतिलीटर ८ ते १० रुपये याप्रमाणे देतात, असे अन्न व औषध प्रशासन विभागाचे नोडल अधिकारी अरुण भुजबळ यांनी सांगितले.

Web Title: pakoda bhaji on the street food recipe disadvantage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.