Pune | कार्ला गडावर आई एकवीरा देवीचा मानाचा पालखी मिरवणूक सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2023 02:50 PM2023-03-29T14:50:18+5:302023-03-29T14:51:20+5:30

गडावर पारंपरिक वाद्यांच्या गजरात पालखी सोहळा पार पडला...

palanquin procession in honor of Mother Ekvira Devi was held at Karla Fort | Pune | कार्ला गडावर आई एकवीरा देवीचा मानाचा पालखी मिरवणूक सोहळा

Pune | कार्ला गडावर आई एकवीरा देवीचा मानाचा पालखी मिरवणूक सोहळा

googlenewsNext

लोणावळा (पुणे) : महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व कोळी, आग्री, सिकेपी, सोनार अशा विविध समाजाचा कुलस्वामिनी असलेल्या कार्ला गडावरील आई एकवीरा देवीचा मानाचा पालखी सोहळा मंगळवारी सायंकाळी सात वाजता कार्ला गडावर उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. आई माउलीचा उदो… उदो…, आई आयलो…च्या नामघोषांनी अवघा कार्ला गड दुमदुमला होता. पालखी मिरवणूक सोहळा शांततेत पार पाडण्यासाठी पोलिस प्रशासन, तालुका प्रशासन व नवनियुक्त विश्वस्त मंडळ यांनी नियोजन केले होते. कडक पोलिस बंदोबस्तात पालखीचे मानकरी असलेल्या चौल, आग्राव व ठाणेकर यांनी पालखीला खांदा लावत ‘आई राजा उदो उदो’चा गजर केला. यावेळी पालखीचे दर्शन घेण्यासाठी व सोहळा ‘याचि देही, याचि डोळा’ पाहण्यासाठी भाविकांनी गडावर तुफान गर्दी केली होती. गडावर पारंपरिक वाद्यांच्या गजरात पालखी सोहळा पार पडला.

महाराष्ट्रातील जागृत देवस्थान अशी ख्याती असलेल्या कुलस्वामिनी आई एकवीरा देवीची चैत्री यात्रा व पालखी सोहळा पाहण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती. कोकण भागातून शेकडो पायी पालख्या गडावर आल्या होत्या. काही दिवस व कित्येक तास पायी प्रवास करत भाविक कार्ल्यात दाखल झाले होते. मोठ्या श्रद्धेने व मनोभावे भाविकांनी देवीचे दर्शन घेतले. यात्रेकरिता कार्ला व वेहेरगावचा परिसर सजला होता. हारफुले, प्रसाद, कुंकू व खेळणी विक्रेते यांची दुकाने साहित्यांनी सजली होती. येणाऱ्या भाविकांना त्रास होऊ नये, याकरिता तालुका प्रशासन व पोलिस विभाग यांच्याकडून सातत्याने विविध विभागांच्या बैठका घेत नियोजन करण्यात आले होते.

यात्रेचे नियोजन

यात्रा काळात देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना योग्य व सुलभ प्रकारे दर्शनाचा लाभ घेता यावा यासाठी मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे, लोणावळाचे पोलिस उपविभागीय अधिकारी आयपीएस सत्यसाई कार्तिक, लोणावळा ग्रामीण पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ, वेहेरगावच्या सरपंच व विश्वस्त अर्चना देवकर, उपसरपंच काजल पडवळ, विश्वस्त नवनाथ देशमुख, मारुती देशमुख, संजय गोविलकर, सागर देवकर, विकास पडवळ, महेंद्र देशमुख, मंडळ अधिकारी माणिक साबळे, तलाठी मीरा बोऱ्हाडे, वन विभाग अधिकारी प्रमोद रासकर, एकवीरा देवस्थान व्यवस्थापक मंगेश गायकवाड, पोलिस पाटील अनिल पडवळ, तसेच विविध शासकीय अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन यात्रेचे नियोजन केले गेले आहे.

Web Title: palanquin procession in honor of Mother Ekvira Devi was held at Karla Fort

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.