संत तुकाराम महाराजांची पालखी पुण्यात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2018 05:51 PM2018-07-07T17:51:46+5:302018-07-07T17:52:05+5:30

पिंपरीत विसाव्याला असलेल्या तुकाराम महाराजांच्या पालखीचे दुपारी 5 वाजून 6 मिनिटांनी शिवाजीनगर येथे आगमन झाले. पिंपरीत विसाव्याला असलेल्या तुकाराम महाराजांच्या पालखीचे दुपारी 5 वाजून 6 मिनिटांनी शिवाजीनगर येथे आगमन झाले.

The palanquin of Saint Tukaram Maharaj was filed in Pune | संत तुकाराम महाराजांची पालखी पुण्यात दाखल

संत तुकाराम महाराजांची पालखी पुण्यात दाखल

Next

पुणे : पिंपरीत विसाव्याला असलेल्या तुकाराम महाराजांच्या पालखीचे दुपारी 5 वाजून 6 मिनिटांनी शिवाजीनगर येथे आगमन झाले. पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक तसेच शिवाजीनगरचे आमदार विजय काळे यांनी वारीचे स्वागत केले. यावेळी पालखीवर फुलांचा वर्षाव करण्यात आला.

संत तुकाराम महाराज्यांची पालखी सकाळीच पिंपरीहून पुण्याकडे निघाली. पालखीच्या समोर दिंड्यांची रांग होती. संत तुकारामांचा जयघोष करत विणा हातात घेतलेले वारकरी तसेच तुळशीवृंदावन हातात घेतलेल्या माऊली पालखी समोर चालत होत्या. पालखी शिवाजीनगरला दाखल होताच पादुकांचं दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला होता. काही मिनिटांसाठी पालखी शिवाजीनगरला थांबवल्यानंतर पुढे मार्गस्थ झाली. पालखीचा मुक्काम आज पुण्यातच असणार आहे.

Web Title: The palanquin of Saint Tukaram Maharaj was filed in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.