पुण्यापेक्षा पालघर, नाशिक, नगरचा रिकव्हरी रेट जास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:09 AM2020-12-27T04:09:11+5:302020-12-27T04:09:11+5:30

राज्यात कोरोनाचा प्रार्दुभाव पुण्यापासूनच सुरु झाला. पहिला रुग्ण पुणे शहरात सापडल्यानंतर पुढील दोन-तीन महिन्यांमध्ये रुग्णसंख्या झपाट्याने वाढली. पुणे कोरोनाचा ...

Palghar, Nashik and Nagar have higher recovery rate than Pune | पुण्यापेक्षा पालघर, नाशिक, नगरचा रिकव्हरी रेट जास्त

पुण्यापेक्षा पालघर, नाशिक, नगरचा रिकव्हरी रेट जास्त

Next

राज्यात कोरोनाचा प्रार्दुभाव पुण्यापासूनच सुरु झाला. पहिला रुग्ण पुणे शहरात सापडल्यानंतर पुढील दोन-तीन महिन्यांमध्ये रुग्णसंख्या झपाट्याने वाढली. पुणे कोरोनाचा हॉटस्पॉट म्हणून पाहिले जाऊ लागले. सप्टेंबर महिन्यापर्यंत रुग्णांची संख्या भीतीदायक पध्दतीने वाढत होती. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर कमालीचा ताण निर्माण झाला होता. रुग्णांना बेड उपलब्ध होत नसल्याने अवघड परिस्थिती निर्माण झाली. जिल्ह्यातील कोरोना आटोक्यात यावा, यासाठी विशेष टास्क फोर्सचीही नियुक्ती करण्यात आली.

गेले तीन महिने संख्या आटोक्यात राहिल्याने नागरिकांना आणि यंत्रणेला काहीसा दिलासा मिळाला आहे. सध्या जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची एकूण संख्या ३,५९,७७३ इतकी आहे. तर, बरे झालेल्या रुग्णांची संख्या ३,४३,४५६ एवढी आहे. जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट २.१४ इतका आहे. सध्या जिल्ह्यामध्ये सक्रिय रुग्ण ७७३४ इतके आहेत. यापैकी २०४३ रुग्ण रुग्णालयांमध्ये तर ५६९१ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत.

----------------

जिल्हयातील एकूण रुग्ण - ३,५९,७७३

जिल्ह्यात सध्या सक्रिय रूग्ण - ७७३४

बरे झालेले रुग्ण - ३,४३,४५६

-----------------------

जिल्हा बरे झालेले रुग्ण एकूण रुग्ण रिकव्हरी रेट

पालघर ४५,३७७ ४६,५०६ ९७.५७

नगर ६५,९२३ ६८,४०६ ९६.३७

नाशिक १,०९,४३० १,१३,८०४ ९६.१५

पुणे ३,४३,४५६ ३,५९,७७३ ९५.४६

ठाणे २,३६,४२८ २,५२,२७३ ९३.७१

मुंबई २,६९,६७२ २,८९,८०० ९३.०५

नागपूर १,१५,३६८ १,२३,२६६ ९३.५९

रायगड ६३,२०५ ६५,९४३ ९५.८४

Web Title: Palghar, Nashik and Nagar have higher recovery rate than Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.