आग्य्राहून सुटका स्मृतिदिनिमित्त किल्ले राजगडावर पालखी सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:10 AM2020-12-22T04:10:32+5:302020-12-22T04:10:32+5:30

पुणे महापालिका आणि श्री शिवाजी राजगड स्मारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ३५४ वा आग्य्राहून सुटका स्मृतीदिनानिमित्त ''''''''किल्ले राजगड उत्सव''''''''चे ...

Palkhi ceremony at Fort Rajgad on the occasion of Memorial Day | आग्य्राहून सुटका स्मृतिदिनिमित्त किल्ले राजगडावर पालखी सोहळा

आग्य्राहून सुटका स्मृतिदिनिमित्त किल्ले राजगडावर पालखी सोहळा

Next

पुणे महापालिका आणि श्री शिवाजी राजगड स्मारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ३५४ वा आग्य्राहून सुटका स्मृतीदिनानिमित्त ''''''''किल्ले राजगड उत्सव''''''''चे आयोजन केले होते. यावेळी श्री शिवाजी राजगड स्मारक मंडळाचे संस्थापक वसंतराव प्रसादे , सुर्यकांत भोसले, संजय दापोडीकर, रश्मी अनिल मते, अजित काळे, अनिरुध्द हळंदे , सुनील वालगुडे, संपत चरवड, सतीश सोरटे, योगेंद्र भालेराव, निलेश बारावकर, अभिजित पायगुडे, शशी रसाळ, गुरुदत्त भागवत, अमोल व्यवहारे, निखिलेश ठाकूर, प्रशांत पायगुडे आदी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत सिद्धार्थ पारखे हे होते. तसेच महिलांचा व लहान मुलांचा सहभागही होता.

सकाळी वंशपरंपरेनुसार गडकरी असलेले सुर्यकांत भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. त्यानंतर पाली दरवाजा ते महाराजांच्या सदरेपर्यंत पालखी मिरवणूक सोहळा झाला. आनंदोत्सवाच्या पूर्वसंध्येला राजगड पायथ्याच्या येथील पाली गावात गडजागरणाचा कार्यक्रम झाला. राजगड पायथ्याला ढोल-ताशांच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी दीपक कसबे यांनी शिवप्रेमींना मार्गदर्शन करीत या घटनेचे महत्त्व सांगितले. खंडोबाच्या माळावरील कार्यक्रमास निलेश भिसे , सौरभ करडे, मारुती आबा गोळे हे वक्ते देखील लाभले व पाल गावचे सरपंच शिर्के, पोलीस पाटील दरडिके आदी मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Palkhi ceremony at Fort Rajgad on the occasion of Memorial Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.