ओझरला द्वारयात्रेनिमित्त पालखीसोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:16 AM2021-09-08T04:16:10+5:302021-09-08T04:16:10+5:30

पहाटे ५.०० श्री विघ्नहराची महापूजा करून धार्मिक विधी करण्यात आले. सकाळी ठीक ७ वाजता श्रींची महाआरती करण्यात आली. ठीक ...

Palkhi ceremony for Ojhar's Dwarayatra | ओझरला द्वारयात्रेनिमित्त पालखीसोहळा

ओझरला द्वारयात्रेनिमित्त पालखीसोहळा

Next

पहाटे ५.०० श्री विघ्नहराची महापूजा करून धार्मिक विधी करण्यात आले. सकाळी ठीक ७ वाजता श्रींची महाआरती करण्यात आली. ठीक ९.३० वा. मोरया गोसावी यांच्या पदांचे गायन करून देवस्थान ट्रस्टच्या वाहनामधून अध्यक्ष व विश्वस्त, कर्मचारीवृंद यांच्यासमवेत पहिला पूर्वद्वार उंब्रज या ठिकाणी महालक्ष्मी मातेच्या मंदिरात लक्ष्मी-नारायणपूजा करण्यात आली.

सालाबादप्रमाणे महालक्ष्मीमातेला आपल्या जन्माचे आमंत्रण देण्यात आले. गणेश जन्मोत्सवानिमित्त मंदिरात रांगोळी, स्वच्छता, श्रींच्या मूर्तीला आकर्षक फुलांची सजावट, मंदिराला विद्युत रोषणाई, इत्यादी मोठ्या प्रमाणात करण्यात आली. सर्व ग्रामस्थ, भाविकांना देवस्थान ट्रस्ट कोरोनाच्या महामारीत गर्दी करू नका, सामाजिक अंतराचे पालन करा, सॅनिटायझर, मास्क जवळ बाळगा, असे आवाहन करण्यात आले होते. त्याचे काटेकोरपणे पालन ग्रामस्थ व भाविकांनी केले. इंटरनेटद्वारे मोबाइलद्वारे सोहळ्याचे थेट प्रक्षेपण भाविकांना पाहता आले.

Web Title: Palkhi ceremony for Ojhar's Dwarayatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.