धामणी येथे पालखी मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:13 AM2021-09-07T04:13:28+5:302021-09-07T04:13:28+5:30

श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार व चंपाषष्ठी एकाच दिवशी असल्यामुळे आजच्या सोमवतीला विशेष महत्व होते. सकाळी वाघे व वीर मंडळीनी ...

Palkhi procession at Dhamani | धामणी येथे पालखी मिरवणूक

धामणी येथे पालखी मिरवणूक

googlenewsNext

श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार व चंपाषष्ठी एकाच दिवशी असल्यामुळे आजच्या सोमवतीला विशेष महत्व होते. सकाळी वाघे व वीर मंडळीनी गावातून पालखी मंदिरात नेऊन देवाचा पंचधातूचा मुखवटा भगत मंडळीकडून घेऊन वाजत-गाजत भगताच्या विहिरीवर आणण्यात आला. या वेळी सोमवतीचे मानकरी नरके, गावडे, राजगुरु, पडवळ, आवटे, पंचरास मंडळीच्या हस्ते देवाच्या मुखवट्याला स्नान घालण्यात आले. त्यानंतर अभिषेक व पूजा पार पडल्यानंतर आरती करण्यात आली. त्यानंतर देवाचे पुजारी दादाभाऊ भगत, प्रभाकर भगत, सुभाष तांबे, माऊली जाधव (वाघे), सिताराम जाधव, राजेश भगत, नामदेव भगत, नामदेव वीर, दिनेश जाधव, शांताराम भगत यांनी ग्रामस्थाच्या वतीने खंडोबाच्या मानकरी मंडळीचा सत्कार केला.

त्यानंतर पालखीची गावातील पेठेतून वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली. सदानंदाचा येळकोटचा जयघोष करून भंडाऱ्याची उधळण करण्यात आली. पालखीचे दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केलेली होती. सोमवतीचा खंडोबाच्या सेवेकरीचा पारंपरिक मान तळेगाव ढमढेरे येथील समस्त नरके मंडळीचा असतो. कोरोनाच्या संसर्गामुळे यंदा साध्या पध्दतीने पालखी मिरवणूक काढण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता. धामणीच्या पंचरास मंडळीच्या पारंपरिक ताफ्यातील हलगी, ढोलकी, सनई, संबळ, तुतारी व ताशाच्या निनादात मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. सदानंदाचा येळकोटचा जयघोष करुन मिरवणुकीत भंडाऱ्याची ॉउधळण करण्यात आली.

--

फोटो क्रमांक - ०६ मंचर धामणी खंडोबा पालखी

फोटोखाली: धामणी येथील कुलस्वामी श्री म्हाळसाकांत खंडोबाच्या पालखीचा मिरवणुकातील क्षण.

Web Title: Palkhi procession at Dhamani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.