जुन्नरमध्ये ग्रामदैवत सिद्धीविनायक मंडळाची पालखीतुन शोभायात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:12 AM2021-09-11T04:12:30+5:302021-09-11T04:12:30+5:30

दुपारच्या सुमारास मिरवणुकीत गर्दी होणार नाही याची दक्षता घेत कार्यकर्त्यांनी टाळमृदंगाच्या गजरात, फुलांच्या वर्षावात शोभायात्रा काढली. दुपारी श्री गणेशाची ...

Palkhi procession of village deity Siddhivinayak Mandal in Junnar | जुन्नरमध्ये ग्रामदैवत सिद्धीविनायक मंडळाची पालखीतुन शोभायात्रा

जुन्नरमध्ये ग्रामदैवत सिद्धीविनायक मंडळाची पालखीतुन शोभायात्रा

दुपारच्या सुमारास मिरवणुकीत गर्दी होणार नाही याची दक्षता घेत कार्यकर्त्यांनी टाळमृदंगाच्या गजरात, फुलांच्या वर्षावात शोभायात्रा काढली. दुपारी श्री गणेशाची ग्रामदैवत सिद्धिविनायक गणेश मंदिरात दुपारी विधिवत स्थापना करण्यात आली. तत्पूर्वी पारंपरिक पालखीत छत्र, अब्दागिरीच्या साथीत श्री गणेशाच्या मूर्तीची मूर्तिकार मुकुंद राक्षे यांच्या निवासस्थानापासून सिद्धीविनायक मंदिरापर्यंत शोभायात्रा मिरवणूक काढण्यात आली. गणेशमूर्तीवर पूर्ण मार्गावर पुष्प वर्षाव करण्यात येत होता. मंडळाचे अध्यक्ष संदेश खत्री, संदेश खत्री, उपाअध्यक्ष मंदार ढोबळे, कार्याध्यक्ष सलीम मुलाणी, सचिव राजू कुदले, सुयोग कर्पे, खजिनदार, प्रदिप होगे, नगराध्यक्ष शाम पांडे, नगरसेवक नंदकुमार तांबोळी, माजी उपनगराध्यक्ष संजय सांखला, विजय ताथेड, सुनील शिंदे विनायक कर्पे, संजय कर्पे, सचिन ताथेड आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.

कल्याण पेठ, परदेशपुरा पेठ, वरली आळी, सराई पेठ, शंकरपूरा पेठ, सदाबाजार पेठ, सराई पेठ आदी मंडळांनी मिरवणूक न काढता अगदी शांततेत गणेशाची प्रतिष्ठापना केली. जुन्नर पोलिसांनी धान्य बाजारासह प्रमुख बाजारपेठेत दुचाकी, चारचाकी वाहने अडवली व बाजारपेठेतील रस्ते पायी जाणाऱ्यांसाठी राखीव केले त्यामुळे गर्दीवर नियंत्रण राहिले. पोलीस निरीक्षक विकास जाधव यांच्या नेतृत्वात बंदोबस्त केला होता.

--

फोटो क्रमांक :

फोटो ओळी : पारंपरिक पालखीतून मिरवणूक काढण्यात आलेल्या रविवार पेठ, गणेशोत्सव मंडळ

100921\img-20210910-wa0012.jpg

जुन्नरमध्ये ग्रामदैवत सिद्धीविनायक  रविवार पेठ मंडळाची गणेश मुर्तीची पालखीतुन शोभायात्रा

Web Title: Palkhi procession of village deity Siddhivinayak Mandal in Junnar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.