पालखीमार्गास होणार मार्चमध्ये सुरुवात?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2019 11:20 PM2019-01-10T23:20:32+5:302019-01-10T23:21:04+5:30

ग्रामस्थांच्या बैठकीत प्रांताधिकाऱ्यांचे संकेत : प्रशासकीय हालचालींना वेग

Palkhi road to start in March? | पालखीमार्गास होणार मार्चमध्ये सुरुवात?

पालखीमार्गास होणार मार्चमध्ये सुरुवात?

googlenewsNext

बारामती : निकट येत चालेल्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देहू ते पंढरपूर पालखीमार्गाच्या कामास मार्च महिन्यात सुरुवात होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. याबाबतचे संकेत ग्रामस्थांशी झालेल्या बैठकीत खुद्द प्रांताधिकाºयांनी दिले आहेत. तत्पूर्वी येत्या ४ दिवसांत मोबदला निश्चिती होणार असून, पालखीमार्ग बाधितांना लवकरच पैशांचे वाटप करण्याच्या दृष्टीने प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे.

गुरुवारी (दि. १०) बारामती येथील प्रशासकीय भवनमधील पालखीमार्ग कार्यालयात लासुर्णे येथील ग्रामस्थांच्या झालेल्या बैठकीत प्रांताधिकाºयांनी हे संकेत दिले. या वेळी माहिती देताना प्रांताधिकारी म्हणाले, पाटस ते बारामती या पट्ट्यातील १४ गावांपैकी १३ गावांची मोजणी झाली आहे. तर एका गावाची मोजणी अद्याप झाली नाही. तर बारामती ते इंदापूर या पट्ट्यातील २५ पैकी २२ गावांची मोजणी झाली आहे. या भागातील ३ गावांची मोजणी अद्याप झाली नाही. या गावांचे बाधित क्षेत्र काढण्याचे काम सुरू आहे. मोजणी झालेल्या क्षेत्रापैकी ज्या जमीनमालकांचे जास्तीचे क्षेत्र दाखवण्यात येत आहे, त्या क्षेत्रातील आदी सूचना जारी करण्यात येणार आहे. परंतु तत्पूर्वी राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीने राजपत्र प्रसिद्ध होणार आहे. जास्तीच्या क्षेत्राची ‘थ्री डी’ मोजणी करण्यात येईल. संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित जागामालकांना पैशांचे वाटप करण्यात येईल. येत्या दोन-चार दिवसांमध्ये मोबदला निश्चिती करण्याचे काम सुरू आहे. या वेळी ग्रामस्थांच्या शंकेला उत्तर देताना प्रांताधिकारी म्हणाले, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग व संत तुकाराम महाराज पालखीमार्गाच्या मोबदल्यामध्ये कोणताही फरक राहणार नाही. तसेच डीसीआरनुसार जर ही रक्कम काढायची ठरल्यास निश्तितच पुणे जिल्ह्याचा डीसीआर जास्त आहे. त्यामुळे जो मोबदला ठरला आहे त्यानुसार देण्यात येईल. या वेळी लासुर्णे येथील पालखीमार्ग बाधितांनी सध्या जशी मोजणी झाली आहे, त्यानुसारच महामार्गाचे काम करावे, अशी मागणी केली. तर काही किरकोळ तक्रारी वगळता ही बैठक खेळीमेळीत पार पडली. या वेळी काही ग्रामस्थांनी दोन्ही बाजूने समान संपादन व्हावे. लासुर्णे गावाच्या दक्षिण बाजूने जुन्या बारामती-इंदापूर रस्त्यावरून पालखीमार्ग न्यावा, अशी सूचना मांडली. हा मार्ग दक्षिण बाजूने ५० सरकवला जावा असेही सांगितले.

४ग्रामस्थांशी बोलताना प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी पालखीमार्गाचे भूमिपूजन फेब्रुवारी महिन्यात होईल तसेच कदाचित मार्च महिन्यापासून पालखी मार्गाच्या कामास सुरूवात होणार असल्याचे सांगितले. मात्र यानंतर प्रांताधिकाºयांना याबाबत अधिक माहिती विचारली असता ‘लोकमत’शी बोलताना त्यांनी सारवासारव केली. तसेच लवकरात लवकर काम सुरू होणार असल्याने सध्या मोबदला निश्चितीचे काम सुरू असल्याचे सांगितले.

काही दिवसांपूर्वी संत तुकाराम महाराज पालखीमार्गाच्या सणसर येथील बाह्यवळणास ग्रामस्थांनी विरोध केला होता. येथील भूसंपादनाची मोजणी प्रक्रिया तिसºयांदा ग्रामस्थांनी रोखली. मोजणीला विरोध नाही; मात्र सणसरमधील बाह्यवळणची मागणी वरिष्ठ पातळीवर करून देखील बाह्यवळण रद्द होत नाही. माळीनगरमध्ये बदल होतो. मात्र या ठिकाणी हा बदल होऊ दिला जात नाही, असा आरोप सणसर ग्रामस्थांनी केला आहे.

Web Title: Palkhi road to start in March?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे