पानमळे नामशेष होतायेत!

By admin | Published: September 19, 2014 12:39 AM2014-09-19T00:39:46+5:302014-09-19T00:39:46+5:30

पळसदेव परिसरात एके काळी विडय़ाच्या पानाचे उत्पन्न घेणारा भाग म्हणून ओळखला जात होता. इंदापूर तालुक्यातील पानाचे निमगावनंतर पळसदेव गावचा क्रमांक होता.

Panamale is extinct! | पानमळे नामशेष होतायेत!

पानमळे नामशेष होतायेत!

Next
लोणी देवकर : पळसदेव परिसरात एके काळी  विडय़ाच्या पानाचे उत्पन्न घेणारा भाग म्हणून ओळखला जात होता. इंदापूर तालुक्यातील पानाचे निमगावनंतर पळसदेव गावचा क्रमांक होता.  मात्र, सध्या विविध अडचणींमुळे या भागातील पानमळे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.
इंदापूर तालुक्यात विशेषत: उजनीच्या काठावरील गावामध्ये पानमळ्याचे प्रमाण मोठय़ा प्रमाणात होते. शिवाय निमगाव केतकी येथे प्रसिद्ध पानाची बाजारपेठ असल्याने पानमळ्याला चांगले दिवस होते. मजूरही मोठय़ा संख्येने उपलब्ध होत होते. सध्या निमगाव केतकी भागातील मजूर डाळिंबाच्या बागाकडे वळल्यामुळे पानमळय़ात काम करण्यासाठी कुशल मजुराची मोठय़ा प्रमाणात टंचाई निर्माण झाली आहे. मजूर टंचाई व सतत पानाचे बदलते दर यामुळे वैतागून या भागातील शेतकरी बांधवांनी पानमळे मोडले आहेत.
याबाबत पळसदेव येथील पानमळा शेतकरी दिलीप काळे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सध्या सततच्या मजूर टंचाईला कंटाळून आम्ही उमरगा तालुक्यातून मजूर आणले आहेत, असे सांगितले. यामध्ये पानमळा लागवडीनंतर त्याची (नेटणी)उतरण ही साधारणत : संक्रांतीनंतर केली जाते. पानाची खुडणी यामध्ये मोठय़ा प्रमाणात मनुष्यबळाची आवश्यकता असते. त्यामुळे मुबलक मजूरपुरवठा हा यातील महत्त्वाचा विषय आहे. शेणखत, रासायनिक खते याचा वापर वेळोवेळी करावा लागतो. त्यासाठी मजूर मोठय़ा प्रमाणात आवश्यक असतात. (वार्ताहर)
 
पानांच्या बाजारात सध्या आडतदारांचा मनमानी कारभार सुरू असल्याने त्यातही शेतक:यांचे अतोनात नुकसान होत आहे. बाजारात गेल्यानंतर आडतदारांचे कमिशन मोठय़ा प्रमाणात असल्याने एक प्रकारे शेतक:यांची अडवणूक केली जाते. यामध्ये 6 रुपयांपासून 2क् रुपयांर्पयत दलाली आकारली जाते. त्यामुळे पानमळा शेती एकंदरीत तोटय़ात चालली आहे.
 
4यामध्ये विशेष बाब म्हणजे पानमळा शेतक:यांना कसल्याही प्रकारे शासकीय पातळीवरून मार्गदर्शन केले जात नाही. तशी सोयच उपलब्ध नाही; शिवाय पानाच्या वनस्पतीबाबत संशोधन करण्यासाठी विशेष सोय नसल्याचे हनुमंत काळे यांनी बोलताना सांगितले. 
4सध्या केवळ पारंपरिक पद्धतीने पानमळा शेती करीत आहोत. सध्या पानमळय़ास आवश्यक किंवा वरदान ठरलेली पांगारा वनस्पती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. 
4मात्र, त्यासाठी कोणत्याही प्रकारे या वनस्पतीचे संवर्धन करण्यासाठी शासकीय पातळीवर प्रय} केले जात नाहीत, ही चिंतेची बाब असल्याचे काळे  यांनी सांगितले. 
4या बाबीला वैतागून शेतकरी पानमळा शेतीला पार्यायी पिके घेत असल्याचे चित्र सध्या या भागात पाहावयास मिळत आहे.
 
पानांच्या तोडणीमध्ये एक डाग पान खुडण्यासाठी साधारणत: 35क् ते 4क्क्  रुपये मजुरी द्यावी लागते. (1 डाग म्हणजे 12 हजार पाने) त्यात पाने वेगवेगळय़ा प्रकारची असतात. यामध्ये सरपट, कळी, फापडा अशा प्रकारची पाने असतात. त्याचा प्रत्येकाचा खुडण्याचा दर वेगवेगळा असतो. त्यात पानासाठी कोणत्याही प्रकारचा हमी भाव दिला जात नाही. गणपती व नवरात्रोत्सव सोडला, तर पानाला इतर वर्षभरात समाधानकारक दर नसतो.

 

Web Title: Panamale is extinct!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.