चिंचोशी येथील कोरखंडी विहीरपर्यंतचा पाणंद रस्ता खुला.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:19 AM2021-03-04T04:19:52+5:302021-03-04T04:19:52+5:30

गोकुळवाडी ते कोरखंडी विहीरपर्यंतचा पानंद रस्ता मागील अनेक वर्षांपासून वापराविना बंद होता. परिणामी येथील स्थानिक शेतकऱ्यांना शेतीमध्ये येणे-जाणे तसेच ...

The Panand road to Korkhandi well at Chinchoshi is open. | चिंचोशी येथील कोरखंडी विहीरपर्यंतचा पाणंद रस्ता खुला.

चिंचोशी येथील कोरखंडी विहीरपर्यंतचा पाणंद रस्ता खुला.

Next

गोकुळवाडी ते कोरखंडी विहीरपर्यंतचा पानंद रस्ता मागील अनेक वर्षांपासून वापराविना बंद होता. परिणामी येथील स्थानिक शेतकऱ्यांना शेतीमध्ये येणे-जाणे तसेच शेतमाल दळणवळण करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. या पार्श्वभूमीवर आमदार दिलीप मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच उज्ज्वला गोकुळे व संबंधित शेतकऱ्यांनी पुढाकार घेऊन हा रस्ता शेतकऱ्यांना शेतीमाल वाहतुकीसाठी लोकसहभागातून खुला करणे सहमती दर्शवली. त्यानुसार बुधवारी (दि. ३) तहसीलदार वैशाली वाघमारे यांनी ग्रामस्थांसह रस्त्याची पाहणी करत रस्त्याचे कामास अधिकृत सुरुवात करून दिली.

याप्रसंगी उपसरपंच माया निकम, ग्रामपंचायत सदस्य सुनील जाधव, अमोल कानडे, मंगल शिंदे, कविता गोकुळे, सुभाष मोरे, सचिन भोसकर, सीमा गोकुळे, मंडलाधिकारी विजय घुगे, तलाठी वैशाली झेंडे, सारिका विटे, राहुल पाटील, सतीश शेळके, मारुती चोरमले, शरद दाते, ग्रामसेविका सारिका गोरडे, सचिन चव्हाण आदी ग्रामस्थ उपस्थित होते. सदर रस्त्याचा दीडशे शेतकऱ्यांना लाभ होणार असून दोनशे एकर शेतीतून शेतमाल ने आण करणे सोयीस्कर होणार आहे. तसेच ३६ शेतकरी कुटुंबास मुख्य रस्त्यावर येणे जाण्याची सोय होणार आहे. सदर पानंद रस्त्यामुळे शेतकऱ्यांचे शेती वापरासाठी व शेतमाल वाहतुकीस आवश्यक असलेल्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

चिंचोशी (ता. खेड) येथे पाणंद रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करताना तहसीलदार वैशाली वाघमारे व मान्यवर. (छाया : भानुदास पऱ्हाड)

Web Title: The Panand road to Korkhandi well at Chinchoshi is open.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.