पंचावन्न तास झाले, आरोपी पकडला का नाही? अंजली आंबेडकरांनी केले पोलिसांचा कामावर प्रश्न उपस्थित  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 15:31 IST2025-02-27T15:31:18+5:302025-02-27T15:31:53+5:30

संविधान आणि कायद्यानुसार आरोपी याला शिक्षा झाली पाहिजे. या घटनेचा हलगर्जीपणाला पोलीस आयुक्त जबाबदार धरत आहेत.

pancaavanana-taasa-jhaalae-araopai-pakadalaa-kaa-naahai-anjalai-anbaedakaraannai-kaelae-paolaisaancaa-kaamaavara-parasana-upasathaita | पंचावन्न तास झाले, आरोपी पकडला का नाही? अंजली आंबेडकरांनी केले पोलिसांचा कामावर प्रश्न उपस्थित  

पंचावन्न तास झाले, आरोपी पकडला का नाही? अंजली आंबेडकरांनी केले पोलिसांचा कामावर प्रश्न उपस्थित  

पुणे -स्वारगेट बसस्थानकातील धक्कादायक प्रकरणातील फरार आरोपी दत्तात्रय गाडे याच्या शोधासाठी पुणे पोलिसांकडून मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबवली जात आहे. शिरूर येथील ऊसाच्या शेतात तो लपल्याची शक्यता असल्याने, पोलिसांनी तेथे ड्रोनद्वारे इमेजिंग सुरू केले आहे.

दरम्यान, आज वंचित बहुजन आघाडीच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या अंजली आंबेडकर यांनी स्वारगेट येथील घटनास्थळाची पाहणी करून माध्यमांशी बोलतांना  महाराष्ट्राचा आणि पुण्यात महिला सुरक्षित आहे का ? असा प्रश्न उपस्थित करत सरकारवर टीका केली आहे.

अंजली आंबेडकर म्हणाल्या,'महाराष्ट्रात आणि पुण्यात महिला सुरक्षित आहे का ? असा प्रश्न निर्माण होतो. राज्यात अत्याचार घटना वाढत आहेत. वाढत्या गुन्हेगारीस प्रशासन आणि राज्यकर्ते यांचा हलगर्जीपणा याला कारणीभूत आहे. स्वारगेट सारख्या ठिकाणी ही घटना घडली म्हणजे अतिशय दुर्दैव आहे. परभणीत पोलिस अत्याचारमध्ये युवकाचा बळी गेला. जिथे जिथे अत्याचार होत आहेत तिथे निःपक्ष चौकशी व्हावी.

आरोपी पकडला का नाही असा प्रश्न पोलिसांना विचार पाहिजे. संविधान आणि कायद्यानुसार आरोपी याला शिक्षा झाली पाहिजे. या घटनेचा हलगर्जीपणाला पोलीस आयुक्त जबाबदार धरत आहेत. पोलीस आरोपीला काही वेळेस पाठीशी घालतात किंवा गुन्हा गंभीर आहे की नाही हे पाहतात. अशाही त्या म्हणाल्या आहे.  



त्या पुढे म्हणाल्या,'पंचावन्न तास झाले या घटनेला आरोपी अजूनपर्यंत सापडलेला नाही. आरोपीला पकडलं आहे की नाही हा प्रश्न तुम्ही खरं म्हणजे पोलिसांना विचारायला पाहिजे आणि आपण सगळे संविधान मानणारी लोकं आहोत त्यामुळे बलात्काराच्या शिक्षेला जी काही संविधानामध्ये तरतूद आहे तीच शिक्षा त्या बलात्कार करणाऱ्या आरोपीला त्याच्यामध्ये झाली पाहिजे. हीच आमची मागणी राहील. कारण आम्ही संविधानाच्या आणि कायद्याच्या पलीकडे मागण्या करत नाही आहोत.

त्याचबरोबर बलात्काराची चौकशी अत्यंतपणे कठोरपणे व्हायला पाहिजे. चौकशीवेळी कुठलीही चूक व्हायला नको कारण कित्येक वेळेला केस उभी राहिल्यानंतर आरोपी सुटतात. त्याचं कारण तपासातल्यास चौकशीवेळीच्या त्रुटी असतात. त्यामुळे तपासात हे त्रुटी राहू नये याची जबाबदारी ही पोलीस खात्याची असेल. माझं संपूर्ण एसटी प्रशासनाला सुद्धा विनंती आहे की,'महाराष्ट्रातल्या सर्व ST स्थानकावरती महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनी काम करावे.'

Web Title: pancaavanana-taasa-jhaalae-araopai-pakadalaa-kaa-naahai-anjalai-anbaedakaraannai-kaelae-paolaisaancaa-kaamaavara-parasana-upasathaita

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.