पंचांगकर्ते देशपांडे यांचा ‘पंचांग बृहस्पती’ने सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:15 AM2021-08-18T04:15:21+5:302021-08-18T04:15:21+5:30
पुणे : पंचांग क्षेत्रातील कार्याबद्दल पुण्यातील पंचांगकर्ते गौरव देशपांडे यांना नुकतेच ‘पंचांगबृहस्पती’ या उपाधीने गौरविण्यात आले. कर्नाटकातील बेळगाव येथील ...
पुणे : पंचांग क्षेत्रातील कार्याबद्दल पुण्यातील पंचांगकर्ते गौरव देशपांडे यांना नुकतेच ‘पंचांगबृहस्पती’ या उपाधीने गौरविण्यात आले. कर्नाटकातील बेळगाव येथील संकेश्वर येथे संकेश्वर (करवीर) पीठाचे चोविसावे शंकराचार्य श्री सच्चिदानंद अभिनव विद्यानृसिंहभारती यांच्या हस्ते ही उपाधी, मानपत्र व महावस्त्र देशपांडे यांना प्रदान करण्यात आले.
संगणक अभियंता असलेले पुण्यातील गौरव देशपांडे गेल्या दहा वर्षांपासून सूर्यसिद्धांत या भारतीय खगोलगणित पद्धतीद्वारे महाराष्ट्रात अचूक व शास्त्रशुद्ध पंचांग निर्मिती करीत आहेत. या पंचांग कार्याबद्दल यापूर्वीही त्यांना शृंगेरी शंकराचार्य, जगन्नाथपुरीचे शंकराचार्य, तसेच काशी विद्वत्परिषद यांनी सन्मानित केले आहे.
फोटो ओळ - पंचांगकर्ते गौरव देशपांडे यांचा ‘पंचांग बृहस्पती’ उपाधीने सन्मान करताना शंकराचार्य श्री सच्चिदानंद अभिनव विद्यानृसिंहभारती. फोटोत (डावीकडून) शंकराचार्य व गौरव देशपांडे.