पंचायतीचे ठराव सरपंचावर बंधनकारक, ग्रामपंचायतीच्या कारभारावर ओढले ताशेरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 06:27 AM2017-10-04T06:27:43+5:302017-10-04T06:28:32+5:30

कायद्याप्रमाणे पंचायतीवर लादलेली सर्व कर्तव्ये तसेच पंचायत समितीने केलेले ठराव यांच्या अंमलबजावणीची प्रत्यक्षात जबाबदारी सरपंचांवर असते. पंचायत ही व्यक्तिभूत संस्था

Panchayat resolution mandates Sarpanch, draws on the work of the Gram Panchayat | पंचायतीचे ठराव सरपंचावर बंधनकारक, ग्रामपंचायतीच्या कारभारावर ओढले ताशेरे

पंचायतीचे ठराव सरपंचावर बंधनकारक, ग्रामपंचायतीच्या कारभारावर ओढले ताशेरे

googlenewsNext

नीरा : कायद्याप्रमाणे पंचायतीवर लादलेली सर्व कर्तव्ये तसेच पंचायत समितीने केलेले ठराव यांच्या अंमलबजावणीची प्रत्यक्षात जबाबदारी सरपंचांवर असते. पंचायत ही व्यक्तिभूत संस्था असल्याने सरपंचांकडून आपले अधिकार बजावून त्यांच्याकडूनच जबाबदाºया व कर्तव्ये पार पाडते. मात्र, याचा अर्थ पंचायत म्हणजे सरपंच नव्हे. सरपंचपद महत्त्वाचे तसेच जोखमीचे असून पंचायतीचे ठराव सरपंचांवर बंधनकारक आहेत. त्यामुळे चौकशीअंती निदर्शनास आलेल्या वस्तुस्थितीतील बाबींवर कार्यवाही करण्याची नोटीस पुरंदरच्या गटविकास अधिकाºयांनी सरपंच दिव्या पवार यांना बजावून कानउघाडणी केली आहे.
नीरेच्या सरपंच दिव्या पवार यांच्या मनमानी कारभारामुळे गावाच्या विकासाला खीळ बसली असल्याची तक्रार उपसरपंच बाळासाहेब भोसले यांनी केली होती.
विविध समित्या निर्माण करण्याचे विषय मासिक सभेच्या विषयपत्रिकेवर वारंवार मागणी करूनही घेतले जात नसल्याच्या मुद्द्यावर एका महिन्यात तत्काळ समित्यांचे गठन
करण्यात यावे. प्रभाग १, २, ४ व ६ मधील नवीन शौचालय बांधकामाबाबत मंजूर निधीसाठी तांत्रिक मान्यता घ्यावी.
शौचालय दुरुस्तीबाबत सर्वेक्षण करून शौचालयांची दुरुस्ती करावी, दगडेवस्ती येथील कामाचे उर्वरित मूल्यांकन व मटण-मच्छी बाजारतळ विकासासाठी कमी पडणाºया निधीचा प्रस्ताव पंचायत समितीकडे पाठविणे व मूल्यांकनाशिवाय खर्च झालेले २ लाख रुपये अदा केल्याप्रकरणी जबाबदारी निश्चित करणे, चालू वर्षात अंगणवाड्यांना मूलभूत सुविधा पुरविण्याकडे लक्ष देणे.
अपंग लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ देताना हलगर्जीपणा किंवा दिरंगाई होऊ नये याची दक्षता घेणे, थकीत भाडेकरार असलेल्या व्यक्तीचा करार रद्द करून करवसुली ७० टक्क्यांपेक्षा जास्त करणे, एसटी स्टँडमागील ड्रेनेजलाईनच्या दुरुस्तीसाठी ग्रामपंचायत निधीतून तरतूद करून महिनाभरात सांडपाणी व्यवस्थापन करणे, उतारे-दाखले देताना आवक-जावक रजिस्टर ठेवून त्याच्या नोंदी ठेवाव्यात अशा विविध सूचना नोटिशीद्वारे देण्यात आल्या आहेत.

Web Title: Panchayat resolution mandates Sarpanch, draws on the work of the Gram Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.