चौफुल्यावर वारकऱ्यांचा केला पाहुणचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 11:50 PM2018-07-11T23:50:32+5:302018-07-12T00:12:02+5:30

यवत (ता. दौंड) येथील मुक्काम संपवून संत तुकाराममहाराज पालखी सोहळा पंढरीच्या वाटेवर मार्गस्थ झाल्यानंतर वाखारी येथील न्यू अंबिका कला केंद्रात वारक-यांचा पाहुणचार व सेवा तेथील कलाकार मंडळींनी केली.

Pandharpur Palkhi Sohala News | चौफुल्यावर वारकऱ्यांचा केला पाहुणचार

चौफुल्यावर वारकऱ्यांचा केला पाहुणचार

googlenewsNext

यवत : यवत (ता. दौंड) येथील मुक्काम संपवून संत तुकाराममहाराज पालखी सोहळा पंढरीच्या वाटेवर मार्गस्थ झाल्यानंतर वाखारी येथील न्यू अंबिका कला केंद्रात वारक-यांचा पाहुणचार व सेवा तेथील कलाकार मंडळींनी केली. मागील सुमारे ३० वर्षांपासून अंबिका कला केंद्रात पंढरीच्या वारीतील वारकºयांची सेवा केली जाते. आज सहा हजार वारकºयांच्या जेवणाची व्यवस्था तेथे करण्यात आली होती.
अंबिका कला केंद्राचे संचालक अशोक जाधव व जयश्री जाधव यांच्या पुढाकाराने अंबिका कला केंद्रातील पाहुणचार वारकºयांना वारीच्या वाटेवरील एक चांगला अनुभव असतो.
नेहमीच कला केंद्रातील कलाकार मंडळींकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन येथील कलाकारांनी आता पुसला आहे. त्याचप्रमाणे समाजासमोर एक चांगला आदर्श ठेवला आहे. संत तुकाराममहाराज यांच्या समाजातील सर्व घटकांना समान वागणूक देण्याच्या तत्त्वांचे केवळ बोलत बसण्यापेक्षा आचरण करणे जास्त गरजेचे आहे, असा संदेशच येथील कलाकारांनी या निमित्ताने दिला.
कला केंद्रातील कलाकारांनी वारीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन देखील केले होते. आज सकाळपासून कला केंद्राच्या समोर भव्य मैदानात लावण्या व भजनांचा कार्यक्रम पाहण्यास वारकरी गर्दी करत होते. यवतपासून सात ते आठ किलोमीटर चालल्यानंतर विश्रांतीसाठी थांबत असताना
भजने व लावण्या पाहण्यासाठी वारकरी थांबत होते.
चौफुल्याचे नाव लावणी कलेमुळे अवघ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. आता वारीत वारकºयांची सेवा लावणी कलावंत मोठ्या अदबीने करीत असल्याने लावणी कलावंताचा सामाजिक कायार्तील सहभाग उल्लेखनीय झाला आहे.
वाखरी येथे दुपारचे भोजन दिल्यानंतर सायंकाळी वारकºयांना चौफुला येथे चहा व नाष्टा वाटप ठेवल्याची माहिती अशोक जाधव यांनी या वेळी दिली.

Web Title: Pandharpur Palkhi Sohala News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.