पंढरपूर वारी: जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याची जय्यत तयारी ; रथाची साफसफाई सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2021 03:32 PM2021-06-02T15:32:30+5:302021-06-02T15:38:06+5:30
'बायोबबल' पध्दतीने श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा 1 जुलैला पायी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे.
देहूगाव : जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या 336 व्या पालखी सोहळ्याला 1 जुलै रोजी सुरवात होणार असल्याने संस्थानची पालखी सोहळ्याची लगबग सुरू झाली आहे. याचाच एक भाग म्हणजे श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी रथाची साफ सफाईच्या कामाला संस्थानच्या वतीने सुरवात करण्यात आली आहे.
यावेळी सोहला प्रमुख भानुदास मोरे, अजित महाराज मोरे व संजय महाराज मोरे यांच्यासह संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे व विश्वस्त माणिक महाराज मोरे, विशाल महाराज मोरे व संतोष महाराज मोरे उपस्थित होते.
श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने बायोबबल पध्दतीने श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा 1 जुलैला पायी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. मात्र कोविडचा वाढता प्रभाव पाहता शासन स्थरावर त्याचा निर्णय होवून पुढील आढवड्यात पालखी सोहळ्यास शासन परवानगी देणार किंवा नाही हे चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र तो पर्यंत संस्थानच्या वतीने पालखी सोहळ्याच्या तयारीला सुरवात केली आहे. याचाच एक भाग म्हणजे पालखीच्या रथाची साफसफाईला सुरवात केली असून आज संस्थानच्या कर्मचार्यांनी पालखी रथाची साफ सफाई करून पाण्याने धुण्यात आला असून त्याची साफसफाई केली आहे. येत्या दोन दिवसात पालखी रथाबरोबरच, अब्दागिरी, गरूड टक्के, पुजेचे थाल, चौरग व पाट, चोपदाराचा दंड, यांना चकाकी देण्याचे कामे करण्यात येणार आहे. जेणे करून शासनाने पालखी सोहळ्यास परवानगी दिली तर ऐन वेळी धावपळ होणार नाही. त्यामुळे पालखी सोहळ्याची तयारी सुरू केली असल्याची माहिती भानुदास मोरे यांनी दिली आहे.