केडगाव येथील पंडिता रमाबाई मुक्ती मिशन वादाच्या भोवऱ्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2024 02:38 PM2024-07-13T14:38:55+5:302024-07-13T14:39:54+5:30

धर्म परिवर्तनाच्या मुद्द्यावरून विधानसभेत लक्षवेधी ठरलेल्या केडगाव येथील ख्रिश्चन संस्था पंडिता रमाबाई मुक्ती मिशन यामध्ये आणखी दुसरा प्रकार घडल्याने संपूर्ण पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Pandita Ramabai Mukti Mission in Kedgaon in controversy | केडगाव येथील पंडिता रमाबाई मुक्ती मिशन वादाच्या भोवऱ्यात

केडगाव येथील पंडिता रमाबाई मुक्ती मिशन वादाच्या भोवऱ्यात

बापू नवले

केडगाव ( ता. दौंड) पंडिता रमाबाई मुक्ती मिशन येथे तीन अल्पवयीन मुली व एक सज्ञान मुलींचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपी भास्कर निरगट्टी (वय ५३) वित्त व्यवस्थापक म्हणून कार्यरत असणाऱ्याला यवत पोलिसांनी अटक केली आली आहे. अशी माहिती यवत पोलिसांनी दिली आहे.

नुकत्याच धर्म परिवर्तनाच्या मुद्द्यावरून विधानसभेत लक्षवेधी ठरलेल्या केडगाव येथील ख्रिश्चन संस्था पंडिता रमाबाई मुक्ती मिशन यामध्ये आणखी दुसरा प्रकार घडल्याने संपूर्ण पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. ही संस्था अनाथ अंध अपंग मुलींना शिक्षणासाठी रहिवास व मोफत शिक्षण उपलब्ध करून देते. त्या विद्यार्थिनींचे संगोपन, शिक्षण व नोकरी अशा सर्व गोष्टी संस्थेमार्फत अनेक वर्षापासून केले जात आहे. या संस्थेची खाजगी व सरकारी याच परिसरात शाळा आहे. संस्थेमध्ये शेकडो महिला राहत असून त्यामध्येच असणाऱ्या अकाउंटंट सांभाळणाऱ्या व्यवस्थापकाने विनयभंग केल्याप्रकरणी येथील समुपदेशक म्हणून कार्यरत असलेल्या महिलेने यवत पोलिसांना तक्रार दिली. त्यानंतर दौंडचे उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप, यवत पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी आरोपीच्या मुस्क्या आवळल्या.

पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा १७  एप्रिल रोजी घडला तर दाखल १२ जुलै रोजी यवत पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला. दौंड तालुक्यातील या प्रकरणाने या संस्थेत काम करणाऱ्या या आरोपीस कठोर कारवाई करावी अशी मागणी अनेक सामाजिक संस्थांद्वारे करण्यात आली. यावेळी काही सामाजिक संस्था या संस्थेच्या गेट समोर आंदोलनाच्या पावित्र्यात उपस्थित होते. मात्र पोलिसांनी आरोपीस अटक केली असून त्यास चार दिवसांची पोलीस कोठडी देखील सुनावली आहे अशी माहिती मिळताच आंदोलकांनी माघार घेतली. येथील महिलांची सुरक्षा गरजेचे आहे त्या दृष्टीने मिशन प्रशासनाने पावले उचलावे अशी सामाजिक संस्थांमधून प्रतिसाद उठत आहे. पंधरा वर्षांपूर्वी देखील अशाच प्रकारचा एक प्रकार या संस्थेत घडला होता. काही प्रकार घडल्यानंतर उघडकीस येत नाहीत असेही अनेकांचे म्हणणे आहे.

Web Title: Pandita Ramabai Mukti Mission in Kedgaon in controversy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे