वढाणेत माजी जिल्हा परिषद सदस्यांच्या पॅनलचा दणदणीत विजयी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:10 AM2021-01-21T04:10:22+5:302021-01-21T04:10:22+5:30
या निवडणुकीत माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कौले यांनी हनुमान परिवर्तन पॅनलच्या माध्यमातुन ९ पैकी ६ जागा जिंकुन निर्विवाद ...
या निवडणुकीत माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कौले यांनी हनुमान परिवर्तन पॅनलच्या माध्यमातुन ९ पैकी ६ जागा जिंकुन निर्विवाद वर्चस्व मिळावले. तर येथील भैरवनाथ विकास आघाडीचे पॅनल प्रमुख रामभाऊ लकडे, काशिनाथ चौधरी, मच्छिंद्र चौधरी, बाळासो भोंडवे, ॲड. ज्ञानदेव चौधरी, शंकर लकडे, अर्जुन चौधरी, बाबाजी शिंदे, महादेव कौले, प्रकाश चौधरी यांच्या ९ पैकी ३ जागा आल्याने पराभव स्वीकारावा लागला.
येथील भैरवनाथ ग्रामविकास आघाडी आणि हनुमान परिवर्तन पॅनल या दोन पॅनलमध्ये चुरशीची लढत झाली. भैरवनाथ ग्रामविकास आघाडीचे प्रभाग क्रमांक ३ मधील एक जागा बिनविरोध झाली आहे. तर प्रभाग क्रमांक १ मध्ये माजी तंटामुक्त अध्यक्ष भानुदास भानुदास चौधरी यांना पराभव स्वीकारावा लागला. तर या बिनविरोध झालेल्या जागेवरील घरातील तिसरी पिढी ग्रामपंचायतीच्या राजकारणात आली आहे. तर माजी सदस्यांचे पती व विद्यमान सदस्याच्या पत्नीला प्रभाग क्रमांक ३ मधून पराभव स्वीकारावा लागला.
वढाणेतील विजयी झालेल्या उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे :
प्रभाग १: भानुदास गणपत चौधरी, रामदास अंकुश चौधरी, लक्ष्मी बापू चौधरी.
प्रभाग २: विजय विठ्ठल कौले, प्रगती भानुदास चौधरी, शुभांगी छगन चौधरी.
प्रभाग ३: गंगुबाई चिमाजी लकडे, सुनील बाळासो चौधरी तर बिनविरोध म्हणून पूनम लक्ष्मण लकडे.