समर्थ पॉलिटेक्निकमध्ये फलक सादरीकरण स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:09 AM2021-07-16T04:09:10+5:302021-07-16T04:09:10+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क बेल्हा : येथील समर्थ पॉलिटेक्निक यांच्या विद्यमाने राज्यस्तरीय फलक सादरीकरण स्पर्धेचे आयोजन येथील शैक्षणिक ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
बेल्हा : येथील समर्थ पॉलिटेक्निक यांच्या विद्यमाने राज्यस्तरीय फलक सादरीकरण स्पर्धेचे आयोजन येथील शैक्षणिक संकुलात ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले होते. राज्यातील विविध पदविका तंत्रनिकेतन विद्यालयातून सुमारे ३०० विद्यार्थी या पोस्टर सादरीकरण स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते.
यामध्ये पुणे, नाशिक, सांगोला, इंदापूर, संगमनेर, अहमदनगर, मुंबई, नागपूर, सोलापूर, उस्मानाबाद आदी ठिकाणाहून विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
या स्पर्धेमध्ये मोबाईल टेक्नॉलॉजी, कृत्रिम बुद्धिमत्ता, एनर्जी व्हेइकल, पारंपरिक ऊर्जा बचत व संरक्षण यांसारख्या समाजाला आवश्यक असणाऱ्या विषयांवर सादरीकरण करण्यात आले. स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे : ऑनलाईन फलक सादरीकरण मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग
प्रथम क्रमांक- नचिकेत कुलकर्णी (एजी पाटील पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सोलापूर), द्वितीय क्रमांक- आफ्रिन इकरा (जामिया पॉलिटेक्निक, अक्कलकुवा), तृतीय क्रमांक - वैष्णवी मोढवे (शासकीय तंत्रनिकेतन अहमदनगर),
सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग - प्रथम क्रमांक-अपूर्वा गाढवे व प्राची लायगुडे (एकलव्य शिक्षण संस्था पॉलिटेक्निक पुणे),
द्वितीय क्रमांक - सुप्रिया सूर्यवंशी (पिंपरी चिंचवड पॉलिटेक्निक पुणे), तृतीय क्रमांक - नितीन वाघ (पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कॉलेज ऑफ पॉलिटेक्निक, प्रवरानगर लोणी), कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभाग
प्रथम क्रमांक- सिध्देश चौधरी (नवसह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पुणे), द्वितीय क्रमांक - वैष्णवी ढेकणे (भारती विद्यापीठ जवाहरलाल नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पुणे), तृतीय क्रमांक - आदित्य वाडकर (एआयएसएसएमएस पॉलिटेक्निक पुणे),
इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभाग प्रथम क्रमांक - गौरी तिवसकर (शासकीय तंत्रनिकेतन, नागपूर), द्वितीय क्रमांक - आकाश सावंत (एआयटी पॉलीटेक्निक, सांगली), तृतीय क्रमांक - ऋतुजा खंडागळे (शासकीय तंत्रनिकेतन, अवसरी) परीक्षक म्हणून प्रा. महेंद्र खटाटे, प्रा.महेश पोखरकर, राहुल जाधव व प्रा.कांबळे यांनी काम पाहिले. प्रा.नंदकिशोर मुऱ्हेकर, प्रा.राकेश तन्नू, प्रा.हुसेन मोमीन, प्रा.संकेत विघे, प्रा.आदिनाथ सातपुते यांनी या स्पर्धेसाठी परिश्रम घेतले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष वसंत शेळके, उपाध्यक्ष माऊली शेळके, सचिव विवेक शेळके व विश्वस्त वल्लभ शेळके यांनी अभिनंदन केले.