पुण्यातील चतु:शृंगी परिसरात सराईताची दहशत; कोयत्याने वार करत 20 वाहनांची तोडफोड

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2023 12:14 PM2023-04-18T12:14:07+5:302023-04-18T12:14:39+5:30

घटनेत आरोपींनी 4 चारचाकी 14 दुचाकी यांच्यासह जवळपास 20 वाहनांचे तोडफोड करत मोठे नुकसान केले

Panic of innkeepers in Pune ChatuSringi area 20 vehicles vandalized by stabbing | पुण्यातील चतु:शृंगी परिसरात सराईताची दहशत; कोयत्याने वार करत 20 वाहनांची तोडफोड

पुण्यातील चतु:शृंगी परिसरात सराईताची दहशत; कोयत्याने वार करत 20 वाहनांची तोडफोड

googlenewsNext

पुणे/किरण शिंदे : पुण्यातील चतु:शृंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पांडव नगर परिसरात सराईत गुन्हेगाराने आपल्या साथीदारासह कोयत्याने आणि लाकडी दांडक्याने 20 वाहनांची तोडफोड केली. यामध्ये 14 दुचाकी 4 चार चाकी आणि इतर वाहनांचा समावेश आहे. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. 

रुपेश विटकर, चपत्या विटकर, लवकुश चव्हाण, सुरज जाधव, अक्षय जाधव, ईसान पठाण, इस्माईल शेख, बबलू देवकुळे, चैतन्य पवार चिम्या यांच्यासह 18 ते 20 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोनू सुनील अवघडे यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. यातील रुपेश विटकर हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यासह तिघांना चतु:शृंगी पोलिसांनी अटक केली. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, रविवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास आरोपी हातात लोखंडी हत्यार आणि लाकडी दांडके घेऊन पांडवनगर परिसरात गेले. फिर्यादी राहत असलेल्या पीएमसी कॉलनी प्रवेश करून त्यांनी पार्क केलेल्या दुचाकी आणि चार चाकी गाड्यांची तोडफोड केली. रुपेश विटकर यांनी फिर्यादीला या भागामध्ये "अजय व विजय हे दोनच भाई आहेत, त्यांना खुन्नस देतो काय" असे म्हणून मारहाण केली. फिर्यादी प्रतिकार करत असताना रुपेश विटकर यांनी लोखंडी हत्याराने ठार मारण्याचे उद्देशाने त्याच्यावर वार केले. दरम्यान या घटनेत आरोपींनी 4 चार चाकी 14 दुचाकी यांच्यासह जवळपास 20 वाहनांचे तोडफोड करत मोठे नुकसान केले आहे. चतु:शृंगी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

Web Title: Panic of innkeepers in Pune ChatuSringi area 20 vehicles vandalized by stabbing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.