पुणेकरांचा सोमवार वाहतूककोंडीत

By admin | Published: September 22, 2015 03:24 AM2015-09-22T03:24:59+5:302015-09-22T03:24:59+5:30

गणेशोत्सवातील देखावे पाहण्यासाठी शहरात येणाऱ्या भाविकांची आणि वाहनचालकांची गैरसोय टाळण्यासाठी शहरातील प्रमुख रस्त्यांवरील बदल करण्यात आलेली

Pankar's Monday traffic | पुणेकरांचा सोमवार वाहतूककोंडीत

पुणेकरांचा सोमवार वाहतूककोंडीत

Next

पुणे : गणेशोत्सवातील देखावे पाहण्यासाठी शहरात येणाऱ्या भाविकांची आणि वाहनचालकांची गैरसोय टाळण्यासाठी शहरातील प्रमुख रस्त्यांवरील बदल करण्यात आलेली वाहतूकव्यवस्था आणि पाच दिवसांच्या गणपती बप्पासाठी शहरातून निघालेल्या मिरवणुका यांमुळे सोमवारी पुणेकरांना प्रचंड वाहतूककोंडीचा सामना करावा लागला. त्यातच वाहतूक नियमनासाठी प्रमुख रस्त्यांवरील सिग्नल बंद करण्यात आल्याने व कोंडीतून मार्ग काढण्यासाठी वाहनचालकांनी जागा मिळेल तिथे वाहने घातल्याने पोलीसही हतबल झाल्याचे दिसून आले.
गणेशोत्सवात गौरी विसर्जनानंतर शहरातील मध्यवर्ती भागात मानाच्या गणपतींसह प्रमुख मंडळानी साकरलेली आरस आणि देखावे पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक घराबाहेर पडतात. तर, उपनगरांमधून येणारे भाविक दुचाकी तसेच चारचाकी वाहनांमधून देखावे पाहण्यासाठी येत असल्याने मध्यवर्ती भागात आधीच अरुंद असलेले रस्ते वाहतूककोंडीने भरून जातात. त्यामुळे शहर पोलिसांकडून भाविकांची गौरसोय तसेच वाहतूककोंडी टाळण्यासाठी सोमवारपासून प्रमुख रस्त्यांवर पदाचाऱ्यांसाठी तसेच वाहनांसाठी एकेरी मार्ग करण्यात आले होते. त्यानुसार, नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहनही वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त सारंग आवाड यांनी केले होते.

Web Title: Pankar's Monday traffic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.