वेळापत्रकाने पुणेकरांची झोप उडाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 01:05 AM2018-10-25T01:05:46+5:302018-10-25T01:05:54+5:30

शहरामध्ये सोमवार (दि.२९) पासून पाणीकपात करणार आहे. महापालिका प्रशासनाच्या वतीने पाणीकपातीचे वेळापत्रक तयार केले आहे.

Pankar's sleep broke with the schedule | वेळापत्रकाने पुणेकरांची झोप उडाली

वेळापत्रकाने पुणेकरांची झोप उडाली

Next

पुणे : शहरामध्ये सोमवार (दि.२९) पासून पाणीकपात करणार आहे. महापालिका प्रशासनाच्या वतीने पाणीकपातीचे वेळापत्रक तयार केले आहे. रात्री १२ ते पहाटे ४, मध्यरात्री २.३० ते पहाटे ६, दुपारी १ ते सायंकाळी ५ असे रात्रीचे व आॅफिसच्या वेळांचे भान न ठेवता वेळापत्रक तयार केले आहे.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाटबंधारे विभागाने शहराला देण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्यात कपात केली आहे. आता दररोज केवळ ११५० एमएलडी पाणी शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी मिळणार आहे. त्यामुळे आता दोनवेळा पाणीपुरवठा करणे शक्य नसल्याने एकच वेळ पाणीपुरवठा करणार असल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे.
पाणीपुरवठा करताना नेहमीच अन्याय होणाºया बाणेर-बालेवाडी परिसर, सुसरोड, पाषाण लिंकरोड भागात मध्यरात्री अडीच ते पहाटे ४ या वेळेत, मेडिपॉइंट परिसर रात्री १२.३० ते १ वाजेपर्यंत, वारजे जुना जकात नाका परिसर, सहकारनगर पोलीस स्टेशन परिसर, गुरुराज गाडगीळ उद्यान परिसर रात्री १० ते पहाटे ५ वाजेपर्यंत, भोसलेनगर रात्री १० ते पहाटे २, बाणेरगाव पहाटे ४ ते सकाळी ७ पर्यंत बोपोडी पहाटे ४ ते सकाळी ८.३० पर्यंत अशा प्रकारे रात्री-बेरात्री पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक तयार केले आहे.
अप्पर इंदिरानगर भागात दुपारी १२ ते सायंकाळी ४ पर्यंत, सकाळी १० ते ४ यावेळेत सहकारनगर परिसरात, गोखलेनगर, पांडवनगर परिसर सायंकाळी ४ ते रात्री ८, काकडे सिटी दुरारी १२ ते ४, रामनगर झोपडपट्टी दुपारी २.३० ते रात्री ९ अशा वेळांमध्ये पाणी सोडण्यात येणार आहे.
।पाच तास पाणीपुरवठा काही भागासाठीच
शहरामध्ये एकवेळच पाणीपुरवठा करणार असल्याने नागरिकांना पाणी भरण्यास पुरेसा वेळ मिळावा, यासाठी किमान पाच तास पाणी सोडण्याची मागणी पक्षनेत्यांनी केली होती. त्यानुसार महापौरांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत प्रत्येक भागात किमान पाच तास पाणी सोडण्याचा निर्णय घेतला; परंतु पाणीकपातीच्या वेळापत्रकामध्ये काही भागाला अर्धा तास, एक ते दीड तास, दोन तास, असा तर काही भागाला दिवसभर, सात तास, आठ तास, दहा ते बारा तास असा पुरवठा होणार असल्याचे वेळापत्रकावरून स्पष्ट झाले आहे.
।पाणी वितरण व्यवस्थेत तांत्रिक अडचणी
शहराची भौगोलिक रचना वेगळी असून, सध्या शहरात अस्तित्वात असलेली पाणी वितरण व्यवस्था अत्यंत जुनी आहे. लोकसंख्या विचारात घेता यावर अनेक मर्यादा येतात; उंचसखल भागामुळे पाण्याच्या वितरण व्यवस्थेत अनेक तांत्रिक अडचणी आहेत. यामुळे संपूर्ण शहराला पाणीपुरवठा करताना वेळेचे नियोजन करताना २४ तासांचा विचार करून वितरण करावे लागते. - प्रवीण गेडाम,
पाणी पुरवठा विभाग अधीक्षक अभियंता
>सर्व पेठांमध्ये पहाटे
५ ते १० वेळेत पाणीपुरवठा
संपूर्ण शहरामध्ये पाणीकपात केली, तरी शहराच्या मध्यवस्तीमधील अनेक पेठांना
पाणीकपातीचा फटका बसला नाही. शहराची भौगोलिक रचना व पाणीपुरवठ्यांच्या कालबाह्य ठरत असलेल्या पाणीपुरवठा वितरण यंत्रणेमुळे ही वेळ येत असल्याचे अधिकाºयांचे म्हणने आहे. यामुळे दिवसातून एकवेळ पहाटे ५ ते १० या वेळेत कमी-जास्त प्रमाणात पेठांमध्ये पाणीपुरवठा करणार आहे.
>पाणीकपातीचे संकट; अधिकारी जपान दौºयावर
सध्या ऐन दिवाळीत पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट आले आहे. पाणीकपातीतही योग्य पद्धतीने पाणीपुरवठा वितरणाच्या नियोजनाची गरज आहे; परंतु शहराच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी जपान येथे जायकाचे प्रशिक्षण घेण्यासाठी गेले आहेत. पाणीपुरवठ्या संदर्भातील गंभीर तक्रारी दूर करण्यासाठी व्ही. जी. कुलकर्णी यांना तातडीने जपानहून बोलावून घ्या, अशी मागणी माजी विरोधी पक्ष नेते उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी यांनी केली आहे. गेल्या एक महिन्यापासून पाणीपुरवठ्याबाबत गंभीर तक्रारी आहेत. अशावेळी पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख जपान येथे जायकाचे प्रशिक्षण घेण्यासाठी गेले आहेत. व्ही. जी. कुलकर्णी पाणीपुरवठा विभागाचे काम अनेक वर्षांपासू नबघत आहेत. त्यामुळेच त्यांना इत्यंभूत महिती आहे. यासाठी त्यांना तातडीने बोलावून घ्या, अशी मागणी उज्ज्वल यांनी महापौर मुक्त टिळक यांच्याकडे केली आहे.
>पाणीकपातीनंतरही या
परिसरात दिवसभर पाणीपुरवठा
कामगार पुतळा, गणेश खिंड रस्ता कोर्ट, सेंट्रलमॉलपर्यंत दोन्ही बाजू पुणे-मुंबई रस्ता, सीआयडी आॅफिस ते मरिआई गेटपर्यंत दोन्ही बाजूस पाणीकपातीनंतर देखील दोन्ही वेळ पाणीपुरवठा होणार असल्याचे महापालिकेच्या वेळापत्रकावरून स्पष्ट झाले आहे.

Web Title: Pankar's sleep broke with the schedule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे