बोधकथा - अनोखे सेवाव्रती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:08 AM2021-05-28T04:08:17+5:302021-05-28T04:08:17+5:30
काहीही न बोलता गुरुजींनी बाईच्या पुढचं घमेलं घेतलं. त्यात विटा भरल्या व घमेलं डोक्यावर घेऊन ते गवंड्याला देऊ लागले. ...
काहीही न बोलता गुरुजींनी बाईच्या पुढचं घमेलं घेतलं. त्यात विटा भरल्या व घमेलं डोक्यावर घेऊन ते गवंड्याला देऊ लागले. ती स्त्री आपल्या तान्ह्या बाळाला थोपटत होती आणि गुरुजींचं विटा वाहण्याचं काम सुरूच होतं. मुकादम छद्मीपणानं त्यांच्याकडं पाहत उभा राहिला. तेवढ्यात सेवा दलाची काही मंडळी गुरुजींना भेटायला आली.
गुरुजींना विटा वाहताना पाहून संतापानं ती लाल झाली आणि मुकादमाला त्यांनी फैलावर घेतलं. गुरुजींनी त्या मंडळींना थोपवलं. गुरुजी कोण आहेत, हे समजल्यावर मुकादम मनातून चांगलाच घाबरला; पण त्याहीपेक्षा शरमिंदा झाला. त्याने गुरुजींची क्षमा मागितली. गुरुजींनी त्याला समजून सांगितल्यावर तो चांगलाच वरमला आणि कामावरच्या महिलांना पुन्हा अशी वागणूक देणार नाही, अशी शपथही त्याने घेतली. आईच्या वात्सल्याला आतूर झालेल्या बालकासाठी आपले मोठेपण बाजूला ठेवून प्रसंगी विटा उचलण्यास सहजतेने तयार असलेल्या सानेगुरुजींचा स्नेहभाव असाच होता. जातील तिथे घरच्यासारखं राहणारे, मनापासून सेवा करणारे व सेवा हेच व्रत मानून पडेल ते काम न लाजता करणारे ते एक सेवाव्रती होते.
- प्रसाद भडसावळे