म्हाडा, आरोग्य अन् टीईटी प्रकरणाचा ईडीकडून समांतर तपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2022 12:36 PM2022-08-08T12:36:40+5:302022-08-08T12:40:02+5:30

मनी लाँड्रिंगच्या संशयातून होणार चौकशी

Parallel investigation by ED in MHADA, Arogya and TET cases | म्हाडा, आरोग्य अन् टीईटी प्रकरणाचा ईडीकडून समांतर तपास

म्हाडा, आरोग्य अन् टीईटी प्रकरणाचा ईडीकडून समांतर तपास

googlenewsNext

पुणे : म्हाडा, शिक्षक भरती पात्रता परीक्षा (टीईटी) आणि आरोग्य विभागातील परीक्षा घोटाळा प्रकरणाचा  सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) समांतर तपास केला जाणार आहे. त्यादृष्टीने ईडीने म्हाडा, आरोग्य विभाग व टीईटी प्रकरणासंबंधीची माहिती पुणे पोलिसांकडून घेतली आहे. पुणे पोलिसांच्या आर्थिक व सायबर गुन्हे शाखेने या तिन्ही परीक्षेतील गैरप्रकार उघडकीस आणले होते. आरोग्य विभागाच्या परीक्षेमधील गैरप्रकाराच्या विद्यार्थ्यांच्या तक्रारीवरून सायबर पोलिसांनी तपास सुरू केला. त्यातून आरोग्याबरोबर म्हाडा व टीईटी परीक्षा घोटाळा उघडकीस आला.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक व सायबर गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांच्या पथकाने म्हाडा, आरोग्य व टीईटी प्रकरणाचा कसून शोध घेत तिन्ही क्षेत्रातील मोठ्या अधिकाऱ्यांना बेड्या ठोकत त्यांच्याकडून कोट्यवधी रुपये जप्त केले होते.दरम्यान, मागील वर्षभर या प्रकरणाची राज्याच्या वेगवेगळ्या भागात कारवाई सुरू होती. 

कागदपत्रे मागवली-

या घाटोळ्यांमधील मनी लाँड्रिंगचा संशय असून, मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याने ईडीच्या पथकाने संबंधित सर्व कागदपत्रे मागवून घेतली आहे. त्यांनीही या प्रकरणाचा समांतर तपास सुरू केला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.संबंधित प्रकरणामध्ये मनी लाँड्रिंग झाल्याची शक्यता वाटत असल्याने ‘ईडी’कडून या प्रकरणाची पुणे पोलिसांकडून माहिती घेण्यात आली असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. 

Web Title: Parallel investigation by ED in MHADA, Arogya and TET cases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.