शाळाबाह्य मुलांसाठी तरुणाची समांतर शाळा
By admin | Published: May 14, 2017 07:31 AM2017-05-14T07:31:29+5:302017-05-14T07:31:29+5:30
सर्व शिक्षण अभियानासारखे उपक्रम राबवुनही झोपडपट्टीत ज्ञानगंगा पोहचली नाही. येथील मुलांना आर्थिक परिस्थितीमुळे शाळ सोडावी लागू नये यासाठी एका तरुणाने समांतर शाळा सुरू केली आहे.
प्राजक्ता पाटोळे / ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 14 - सर्व शिक्षण अभियानासारखे उपक्रम राबवुनही झोपडपट्टीत ज्ञानगंगा पोहचली नाही. येथील मुलांना आर्थिक परिस्थितीमुळे शाळ सोडावी लागू नये यासाठी एका तरुणाने समांतर शाळा सुरू केली आहे.
आबासाहेब गरवारे महाविद्यालयात अर्थशास्त्र विषयात पदवी संपादन करुन एमफीलची तयारी करतअसलेल्या आशुतोष कांबळे या विद्यार्थांने झोपडपट्टीतील मुले शिक्षणात मागे पडत असल्याचे पाहिले. प्रायोगिक तत्वावर चार मुलांना घेऊन शाळा सुरू केली. ह्यअराईस विश्व सोसायटीह्ण या नावाने संस्था त्यासाठी सुरू केली.
२०१४ ते १७ या शैक्षणिक वर्षात शाळा एकूण २०७ मुला - मुलांना त्यांनी प्रशिक्षित केले आहे. पौड रस्त्यावर जयभवानीनगर येथे सोमवार ते शनिवार यासंकाळी ६ ते ११ या वेळेत ही शाळा सुरू करण्यात आली आहे. सर्व विषयांसाठी पात्रताधारक शिक्षक आहेत. आयटी कंपन्यांतील अनेक तरुणही या मुलांना शिकविण्यासाठी येत असतात. यामुळे परिसरातील झोपडपट्यांमधील मुलांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण झाली आहे. अभ्यासातही ही मुले आता चमकू लागली आहे.
या शाळेत आता अगदी फुटपाथवर येणारी मुलेही येऊ लागली आहेत. त्यांना वेगळ्या पध्दतीने शिकवावे लागते. अनेकदा वय जास्त असल्याने ही मुले नेहमीच्या शाळेत जाऊ शकत नाही. त्यांच्यासाठी ही समांतर शाळा खास प्रशिक्षण वर्ग घेते. इतर मुलांच्या बरोबरीने त्यांना आणण्यासाठी काम करते.
याबाबत आशुतोष कांबळे म्हणतो, ह्यह्य मुलांना फुलासारखं जपायला हवं. त्यांच्या गुणांचं कौतुक व्हायला हवं. त्यांना मुक्त जीवन जगण्याची संधी द्यायला हवी. त्यांचं नाजूक मन जपायला हवं. झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांबाबत अनेकदा हे घडत नाही. त्यामुळे ती मागे पडतात. माझ्या आयुष्याचा काही वेळ जर मी त्या भरकटलेल्या मुलांसाठी दिला तर नक्कीच चांगल्या पध्दतीने घडतील. यासाठी ही समांतर शाळा सुरू केली आहे.