ग्रामोन्नती मंडळाच्या महाविद्यालयातील पराक्रमपर्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 12:24 AM2018-10-03T00:24:19+5:302018-10-03T00:24:40+5:30
जीवशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. रसूल जमादार यांनी सर्जिकल स्ट्राइक याविषयी प्रोजेक्टरवर मार्गदर्शन करत असताना भारतीय सैन्य किती बलशाली आहे हे सांगितले.
नारायणगाव : ग्रामोन्नती मंडळाच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात पराक्रमपर्व - सर्जिकल स्ट्राइक दिवस महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या एनसीसी प्रमुख मा. लेफ्टनंट डॉ. दिलीप शिवणे यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला. येथील ग्रामोन्नती मंडळाच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात पराक्रमपर्व- सर्जिकल स्ट्राइक दिवस साजरा करण्यात आला. या वेळी इतिहास विभागाचे प्रमुख प्रा. उत्तम पठारे यांनी युद्धाचा इतिहास याविषयी माहिती देत असताना झेलमचे युद्ध, पानिपत युद्ध, पहिले महायुद्ध, दुसरे महायुद्ध याविषयी व शिवाजी महाराजांची युद्धनीती कशी होती आणि त्यांनी सैन्यदल कसे तयार केले हे सांगितले.
जीवशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. रसूल जमादार यांनी सर्जिकल स्ट्राइक याविषयी प्रोजेक्टरवर मार्गदर्शन करत असताना भारतीय सैन्य किती बलशाली आहे हे सांगितले. यामध्ये आजपर्यंत झालेल्या सर्जिकल स्ट्राइक याविषयी माहिती दिली. पोस्टर सादरीकरण उपक्रम ३६ महाराष्ट्र बटालियनकडून आयोजित करण्यात आला होता. याला छात्रांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या प्रसंगी ५२ पोस्टर तयार करण्यात आले. यामध्ये विविध विषय म्हणजे एल.एम.जी. रायफल, इन्सास रायफल, एसएलआर रायफल, प्रिझम्याटिक कंपास, आर्मी पोस्ट्स, एनसीसी निदेशालय यांसारख्या विषयांवर पोस्टर करण्यात आले. यातून सर्व कॅडेट्सचा गुणगौरव ३६ महाबटालियनकडून करण्यात आला. या सर्व कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य श्रीकांत शेवाळे, उपप्राचार्य होले, क्रीडाप्रमुख प्रा. गिरीश ढमाले, तसेच प्रा. शिरीष पिंगळे, प्रा. अनिल काळे, प्रा. गोविंद रसाळ आणि शिक्षकेतर वृंद उपस्थित होते. या कार्यक्रमास राष्ट्रीय छात्रसेनेचे १०० कॅडेट्स उपस्थित होते. ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटे, कार्याध्यक्ष अनिल मेहेर, कार्यवाह रवींद्र पारगावकर यांचे मार्गदर्शन लाभले. सूत्रसंचालन लक्ष्मी जाधव, तसेच कांबळे यांनी आभार मानले.