प्रसूतीसाठी १०८ सेवा ठरतेय वरदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 06:17 AM2017-07-29T06:17:08+5:302017-07-29T06:17:11+5:30

महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेसची डायल १०८ सेवा गर्भवती महिला आणि अर्भकांसाठी वरदान ठरत आहे.

parasauutaisaathai-108-saevaa-tharataeya-varadaana | प्रसूतीसाठी १०८ सेवा ठरतेय वरदान

प्रसूतीसाठी १०८ सेवा ठरतेय वरदान

Next

पुणे : महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेसची डायल १०८ सेवा गर्भवती महिला आणि अर्भकांसाठी वरदान ठरत आहे. १०८ सेवेच्या रुग्णवाहिकांमध्ये आतापर्यंत राज्यभरातील तब्बल १५,५३६ बालकांनी जम घेतला आहे. रुग्णवाहिकांच्या माध्यमातून तातडीची वैद्यकीय सेवा मिळाल्याने महिलांची सुखरूप प्रसूती झाली आहे. यामध्ये आतापर्यंत पुण्यातील १,००२ बालकांचा समावेश आहे.
नाशिकमध्ये या सेवेचा सर्वाधिक लाभ झाला असून तेथील १,०८५ बालकांनी रुग्णवाहिकेमध्ये जन्म घेतला आहे. राज्यातील एकूण ३५ जिल्ह्यांमध्ये ही सेवा असून रुग्णवाहिकेत प्रसूती झालेली आकडेवारी मोठी असल्याचे यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीवरून समोर आले आहे.
शासनाने २६ जानेवारी २०१४ रोजी ही तातडीची सेवा सुरू केली होती. तेव्हापासून ३० सप्टेंबरपर्यंत म्हणजे जवळपास २ वर्षांत राज्यभरातून या सेवेला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. विविध आपत्कालीन परिस्थितीमध्ये अडकलेल्यांनी या सेवेला सुरुवातीपासून उत्तम प्रतिसाद दिला आहे. नागरिकांनी आपत्कालीन परिस्थितीत १०८ हा क्रमांक डायल केल्यास विनामूल्य सेवा देणारी सुसज्ज रुग्णवाहिका डॉक्टरांसह हजर होते. यामध्ये अपघात, हृदयविकार, भोवळ येणे, अर्धांगवायू, विषबाधा, आगीने भाजणे अशा अनेक प्रकारच्या आपत्कालीन घटनांचा समावेश होतो.

राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने आणि बीव्हीजी इंडिया लिमिटेड या सेवाक्षेत्रातील कंपनीच्या माध्यमातून चालविण्यात येणाºया महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस (डायल १०८) सेवेच्या वतीने अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज अशा ९३७ रुग्णवाहिका या सेवेसाठी राज्याकडे उपलब्ध आहेत. यामध्ये २३३ अ‍ॅडव्हान्स लाईफ सपोर्ट रुग्णवाहिका असून, ७०४ बेसिक लाईफ सपोर्ट रुग्णवाहिका समाविष्ट आहेत.

याबाबत महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसचे मुख्य संचालन अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर शेळके म्हणाले, ‘‘ग्रामीण भागामध्ये काही वेळा दळणवळणाची साधने उपलब्ध नसल्याने आजही बाळंतपणात होणाºया अपघातांची संख्या जास्त आहे. बाळंतपणाच्या कळा सुरू होणार, असे वाटल्यानंतर गर्भवती महिलेच्या कुटुंबीयांनी १०८ सेवेशी संपर्क साधल्यास पुढील त्रास वाचू शकतो. त्यामुळे रुग्णवाहिका बोलावण्यास उशीर न केल्यास गरजू महिलेला वेळेत मदत मिळून मातामृत्यू व अर्भकमृत्यू टाळता येणे शक्य आहे.’’

Web Title: parasauutaisaathai-108-saevaa-tharataeya-varadaana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.