विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचे राजपथावर संचलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 08:16 PM2018-12-15T20:16:43+5:302018-12-15T20:18:51+5:30
शालेय दशेपासून पाहिलेले स्वप्न सत्यात उतरल्याचा आनंद होत असून हा आनंद व्यक्त करण्यासाठी शब्दही अपुरे पडत आहेत
पुणे : शालेय दशेपासून पाहिलेले स्वप्न सत्यात उतरल्याचा आनंद होत असून हा आनंद व्यक्त करण्यासाठी शब्दही अपुरे पडत आहेत.एनआरडीसाठी निवड झाल्याने स्वत:वरचा विश्वास अधिक वाढला असून समाजासाठी देशासाठी काही चांगले करण्याची उर्जा मिळाली आहे,अशा भावना राजपथावर संचलन करून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्याचा मान मिळालेल्या सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या. विद्यापीठाच्या चार विद्यार्थ्यांची व एका विद्यार्थीनीची एनआरडी परेडसाठी निवड झाली आहे.
प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावर देशाच्या विविध सैन्यदलाच्या तुकड्यांचे संचलन होते.त्यात एनएसएसच्या विद्यार्थ्यांच्या तुकडीचाही समावेश असतो.या एनएनएसच्या तुकडीमध्ये महाष्ट्रातील १४ विद्यार्थ्यांचा समावेश झाला असून त्यातील ५ विद्यार्थी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे आहेत.निवड झालेल्या विद्यार्थ्यांवर सध्या कौतुकाचा वर्षाव होत असून येत्या ३० डिसेंबर रोजी हे विद्यार्थी दिल्लीसाठी रवाना होणार आहेत.एनआरडी कॅपसाठी प्रथम विद्यापीठाच्या तीनही जिल्हांमधील विद्यार्थ्यांची जिल्हा स्तरावर निवड फेरी घेण्यात आली.त्यानंतर विद्यापीठ स्थरावरील व राज्य स्तरावरील फेरी झाली.याफेरीतून निवडलेल्या विद्यार्थ्यांची नागपूर येथे पश्चिम विभागातील सर्व विद्यार्थ्यांची चाचणी घेण्यात आली. या चाचणीतून बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयाच्या अक्षय जगदाळे, नºहे येथील सिंहगड इस्टिट्यूटच्या दर्पेश डिंगरे, नाशिक येथील एनव्हीपी कॉलेजच्या पुष्पक जगताप, आकुर्डीतील प्रशांत निकम या विद्यार्थ्यांचा आणि दौंड तालुक्यातील वरवंड येथील एकनाथ सिताराम कॉलेजच्या पूजा पेटकर या पाच विद्यार्थ्यांची निवड करण्यात आहे.
--
गेल्या काही वर्षांपासून घेतलेल्या कष्टाचे फळ मिळाले आहे. देशासाठी राजपथावर संचलन करण्याची संधी मिळाली याचा अत्यंत आनंद होत आहे.
- प्रशांत निकम ,विद्यार्थी
--
लहानपणापासून पाहिलेले स्वप्न आज वास्तवात उतरले आहे. समाजासाठी आणि देशासाठी काही करण्यासाठी अधिक उर्जा मिळाली आहे. तसेच आत्मविश्वास वाढला आहे.
- दर्पेश डिंगर,विद्यार्थी