फीवाढीविरोधात पालकांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2018 02:58 AM2018-09-16T02:58:10+5:302018-09-16T02:58:28+5:30
जेएसपीएम व सिग्नेट स्कूल; नियमबाह्य फीवाढ, गुणवत्ताधारक शिक्षकांची वानवा
हडपसर : जेएसपीएम संस्थेच्या जेएसपीएम व सिग्नेट स्कूलच्या पालकांनी फीवाढ रद्द व्हावी, यासाठी शुक्रवारी सकाळी आंदोलन केले. सीबीएसई पॅटर्ननुसार शिक्षकभरती नाही, तसेच त्याचप्रमाणे गुणवत्ता दिसून येत नसल्याची तक्रार पालकांनी योगेश ससाणे यांच्या नेतृत्वाखाली केले. यावेळी शाळा व्यवस्थापन व पालक यांची कमिटी तयार करून प्रश्न सोडविण्याचे आश्वासन शाळा व्यवस्थापन दिले आहे.
हांडेवाडी रोड येथे जेएसपीएम संस्थेच्या जेएसपीएम ही सीबीएसई बोर्डनुसार शाळा आहे, तर सिग्नेट स्कूल ही एसएससी बोर्डच्या अभ्यासक्रमाची शाळा आहे. यावर्षी शाळेने मागील दोन वर्षांपासून नियमबाह्य फीवाढ केली आहे. तसेच स्टेशनरी, गणवेश, वह्यापुस्तके व इतर अनेक कारणास्तव फी आकारली जात आहे, तसेच शाळेमधील काही शिक्षक हे गुणवत्ता पूर्ण नाहीत. याबाबत पालकांनी वारंवार शाळा व व्यवस्थापनाला निवेदन देण्यात आले होते. मात्र पालकाच्या निवेदनाला केराची टोपली दाखवली. त्यामुळे पालकांनी शिक्षण उपसंचालकाकडे तक्रार केली होती. याबाबत त्यानुसार शिक्षण उपसंचालकाने दखल घेऊन चौकशी पूर्ण होईपर्यंत कसली फीसक्ती व वसुली करू नये, असा आदेश काढला होता. तरीसुद्धा शाळा प्रशासनाने शासनाच्या आदेशाकडे दुर्लक्ष करून विद्यार्थ्यामार्फत फी मागणीचा रेटा लावून धरला. त्यामुळे नगरसेवक योगेश ससाणे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी सकाळी दोनशे पालकांनी आंदोलन केले. यावेळी पालक प्रतिनिधी वर्षा निघोज, शाहिस्ता बेग, योगेश भोसले, सुदाम शेवाळे, अजय नाईक, मनीषा शेलार, दत्ता हरपळे, संदीप जगताप, मोहन मोडक आदी उपस्थित होते. यावेळी संचालक वसंत बुगडे यांनी सांगितले, आम्ही वाढीव फी घेतली नाही.
आम्ही जी फी घेत आहोत ती जुन्या पद्धतीनेच फी भरण्याचे सांगत आहे. तसेच शासनाच्या नियमानुसार उच्चशिक्षित शिक्षकांची नेमणूक केली आहे. याबाबत पालकांनी गैरसमज करून घेऊ नये. याबाबत पालकांना काही शंका असल्यास त्यांनी शाळेत येऊन भेटावे.
उपसंचालकांची स्थगिती जुमानली नाही...
पालक अजय नाईक म्हणाले, की शाळेने नियमबाह्य फी वाढवली आहे. फी भरण्याबाबत शासनाने स्थगिती दिली आहे, याबाबत वाढीव फी भरली नाही की विद्यार्थ्याद्वारे पालकांना रोज दबाव आणला जात आहे. सी. बी. सी. पॅटर्न आहे. मग येथील काही शिक्षकांना इंग्लिश बोलता येत नाही.
नगरसेवक योगेश ससाणे यांनी सांगितले, की पालकांकडून बेकायदा फी वसूल केली जात आहे. याबाबत पालकासोबत आम्ही शिक्षण उपसंचालकाकडे तक्रार नोंदवली आहे. उपसंचालकाने फी घेण्यास स्थगिती दिली, तरी शाळा प्रशासन फी विद्यार्थ्यांवर दबाव टाकून वसूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे.