मुलाच्या मृत्यूच्या धक्क्याने आई-वडिलांची आत्महत्या, पुण्यातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 04:18 AM2018-01-20T04:18:30+5:302018-01-20T04:18:33+5:30
चार वर्षाच्या मुलाला फिट येऊन मृत्यू झाल्याचा धक्का आई-वडिलांना सहन झाला नाही. त्यामुळे संगणक अभियंता आणि त्याच्या पत्नीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना गुरूवारी रात्री
पुणे : चार वर्षाच्या मुलाला फिट येऊन मृत्यू झाल्याचा धक्का आई-वडिलांना सहन झाला नाही. त्यामुळे संगणक अभियंता आणि त्याच्या पत्नीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना गुरूवारी रात्री बाणेर येथे उघडकीस आली. सुमारे दोन दिवस तीनही मृतदेह घरात पडून होते. शेजाºयांनी पोलिसांना त्याबाबतची माहिती दिल्यानंतर ही घटना समोर आली.
जयेश पटेल (३४), भूमिका पटेल (३०), आणि नक्ष पटेल (४) अशी तिघांची नावे आहेत. जयेश हे मूळचे गुजरात येथील अहमदाबादचे आहेत. बाणेर पाषाण लिंक रस्त्यावर बसंत बिहार सोसायटीमध्ये दुसºया मजल्यावर त्यांनी ८० लाख रूपयांचा फ्लॅट घेतला आहे. येरवडा भागातील एका आयटी कंपनीत नोकरीला होते, त्यांना महिना दीड लाख रुपये वेतन होते. त्यांचा चार वर्षांचा मुलगा नक्ष याच्या अर्ध्या शरीराची वाढ होत नव्हती. त्यामुळे तो सतत आजारी पडायचा, त्याला फिटचाही त्रास होता. त्याचा आजार बरा व्हावा यासाठी मोठा खर्चही केला होता.
मंगळवारी नक्षला फिटचा त्रास झाल्यानंतर आईनेने त्याला रूग्णालयात नेले. त्यानंतर बुधवार आणि गुरूवारी जयेश कंपनीत गेले नाहीत. दोन दिवस त्यांच्या फ्लॅटचे दारही उघडले नव्हते. ते बाहेरगावी गेले असावेत, असेशेजाºयांना वाटत होते. दरम्यान, जयेशने आॅफिसमध्ये पूर्वसूचना न देता दोन दिवसांपासून सुटी घेतल्याने त्यांना आॅफीसमधील सहकाºयांनी फोन केला. परंतु त्याला प्रतिसाद मिळाला नाही. अखेर त्यांनी घरी येऊन पोलिसांच्या मदतीने दार तोडले. त्यावेळी तिघांचे मृतदेह दिसून आले.
जयेशने त्याच्या पत्नीचा आणि मुलाचा खून करून स्वत: आत्महत्या केली असावी, अशी शंका होती. डॉक्टरांनी केलेल्या तपासणीमध्ये जयेश पटेल आणि त्यांच्या पत्नीने आत्महत्या केली असून, नक्षचा मृत्यू घातपाताने झाला नसल्याचे स्पष्ट झाले. शवविच्छेदनाचा व्हिसेरा राखून ठेवल्याने नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. नक्षला फिट येऊन त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे, त्याचा धक्का सहन न झाल्याने दोघांनीआत्महत्या केली असावी, असे परिमंडळ तीनचे उपायुक्त गणेश शिंदे यांनी सांगितले.