प्रशासनाला पालकांनी धारेवर धरले
By admin | Published: December 23, 2016 12:09 AM2016-12-23T00:09:06+5:302016-12-23T00:09:06+5:30
पळसदेव (ता. इंदापूर) येथील पळसनाथ विद्यालयात पाचवी व सहावीतील विद्यार्थ्यांच्या पालकांची सभा विद्यालयात बोलावण्यात आली
लोणी देवकर : पळसदेव (ता. इंदापूर) येथील पळसनाथ विद्यालयात पाचवी व सहावीतील विद्यार्थ्यांच्या पालकांची सभा विद्यालयात बोलावण्यात आली होती. या वेळी पालकांनी मुख्याध्यापकांना असुविधांची जाणीव करून दिली. मूलभूत सविधा मिळत नसल्याने पालकांनी विद्यालय प्रशासनाला धारेवर धरले.
विद्यालयात विद्यार्थिनींना स्वच्छतागृहाची, तर मुलांना मुतारी तसेच स्वच्छतागृहाची सोय नसल्याने विशेषत: मुलींची गैरसोय होत असल्याचे पालक संतोष काळे
यांनी सांगितले. तर, पाचवी व सहावीच्या ७० विद्यार्थ्यांना पुस्तकेच दिलेली नसल्याने ही मुले पुस्तकाविनाच शिकत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. विद्यार्थ्यांना पोषण आहारही व्यवस्थित मिळत नसल्याची तक्रार अनेक पालकांनी केली. (वार्ताहर)