पालकांनी सोशल मीडियावरील पाल्यांचा वावर तपासून पाहावा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2019 12:59 AM2019-01-10T00:59:34+5:302019-01-10T01:00:23+5:30
वसंतराव पवार नाट्यगृह येथे इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी सायबर सुरक्षितता विषयावर कार्यशाळा आयोजिली होती.
बारामती : सध्याच्या काळात स्मार्ट फोन आणि इंटरनेट आजच्या पिढीसाठी एक धोका ठरू पाहतोय. किशोरवयीन मुले कळत नकळत स्मार्ट फोन आणि इंटरनेटकडे आकर्षिले जात आहेत. परिणामत: मुलांची एकाग्रता लोप पावते. मुले चिडचिड करतात, त्यांच्या वागणुकीत प्रचंड बदल आपल्याला जाणवत असतो. त्यामुळे पालकांनी विद्यार्थ्यांच्या इंटरनेट तथा आॅनलाईन गेम्स, फेसबुक, ट्वीटर, व्हॉट्सअॅपसारख्या सोशल वेबसाईट व अँड्रॉइड अॅप्सवरील वावर तपासून पाहावा असे आवाहन त्यांनी केले.
वसंतराव पवार नाट्यगृह येथे इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी सायबर सुरक्षितता विषयावर कार्यशाळा आयोजिली होती. कार्यशाळेत ४०३ विद्यार्थी आणि ३५० पालक उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांचा मानसशास्त्रीय अभ्यास करून विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या समास्यांचे प्रश्नोत्तराच्या माध्यमातून उकल काढण्यात आली. आॅनलाईन गेम्स, फेसबुक, ट्वीटर, व्हॉट्सअॅपसारख्या सोशल वेबसाईट व अँड्रॉइड अॅप्सवर विशेष असे मार्गदर्शन करण्यात आले. प्राचार्य मनोहर महाजन यांनी विद्यार्थ्यांच्या इंटरनेट वापरासंदर्भात मार्गदर्शन केले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी हार्दिक कक्कड, माधुरी क्षीरसागर, पल्लवी गवळी, प्रणिता भोसले, शेखर तुपे आणि सुनील कदम यांनी सहकार्य केले.