परिंचे वनक्षेत्रातील पाणवठे भरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:10 AM2021-05-25T04:10:29+5:302021-05-25T04:10:29+5:30
चौदा हजार लिटर पाणी दोन्ही पाणवठ्यात भरण्यात आले असून, एक महिना पुरेल एवढा पाणीसाठा करण्यात आला असल्याचे वनरक्षक गणेश ...
चौदा हजार लिटर पाणी दोन्ही पाणवठ्यात भरण्यात आले असून, एक महिना पुरेल एवढा पाणीसाठा करण्यात आला असल्याचे वनरक्षक गणेश तांबे यांनी सांगितले.
अतिवृष्टीमुळे परिंचे परिसरातील अनेक बंधारे फुटलेल्या अवस्थेत असून, कोरडे पडले आहेत. नैसर्गिक पाणवठ्यांबरोबरच परिसरातील ओढे, नाले, विहिरी आटल्या आहेत. वळवाचा पाऊस या परिसरात झाला नसल्याने डोंगर परिसरात कुठेही पाणी उपलब्ध नाही. दिवसाचे सुद्धा वन्यजीव पाण्याच्या शोधात फिरताना दिसत असल्याचे शेतकरी जाकीर इनामदार यांनी सांगितले.
परिंचे वनक्षेत्रातील पाणवठे एक महिन्यापासून कोरडे पडले होते.वन विभागाकडे या पाणवठ्यात पाणी भरण्यासाठी कोणताही निधी उपलब्ध नसल्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी वन्यप्राण्यांना वणवण भटकावे लागत होते. यामुळे स्वर्गीय एकनाथ काका जगताप प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष जगताप यांनी पाणवठ्यात पाणीपुरवठा करण्यासाठी तयारी दाखवून दोन्ही पाणवठे पाणी सोडून भरले.
२४परिंचे
स्व. एकनाथ काका जगताप प्रतिष्ठानच्या वतीने कोरड्या पडलेल्या पाणवठ्यात पाणी सोडण्यात आले.