‘परिवर्तन महाशक्ती’चे १० उमेदवार जाहीर! आघाडीत बिघाडी अन् युतीही तुटणार असल्याचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 12:38 PM2024-10-22T12:38:48+5:302024-10-22T12:39:31+5:30
विस्थापितांसह प्रस्थापितांचाही परिवर्तन महाशक्तीकडे ओघ वाढेल, असाही केला दावा
लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे: ‘परिवर्तन महाशक्ती’ने बच्चू कडू यांच्यासह १० उमेदवारांची पहिली यादी सोमवारी जाहीर केले. आघाडीत बिघाडी होणार आणि महायुतीदेखील राहणार नाही. उमेदवारी अर्ज दाखल करेपर्यंत हे असे घडणार. त्यामुळे विस्थापितांसह प्रस्थापितांचाही परिवर्तन महाशक्तीकडे ओघ वाढेल, असा दावा या आघाडीच्या नेत्यांनी केला. स्वराज्य पक्षाचे छत्रपती संभाजीराजे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू कडू यांची संयुक्त बैठक पार पडली. त्यात उमेदवार जाहीर करण्यात आले.
१५० जागांवर एकमत: रयत शेतकरी सेनेतर्फे परिवर्तन महाशक्तीला पाठिंबा जाहीर करण्यात आला. आमचे १५० जागांवर एकमत आहे, तरीही १० जागाच जाहीर केल्या, याचे कारण तो आमच्या रणनीतीचा भाग आहे, असा दावा या नेत्यांनी केला.
- शिरोळ आणि मिरज या जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी सोडण्यात आल्या; पण त्यावर कोण उमेदवार असेल, हे राजू शेट्टी त्यांच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेतील.
बच्चू कडू अचलपूरमधून मैदानात
- ओमप्रकाश ऊर्फ बच्चू बा. कडू - अचलपूर - प्रहार जनशक्ती पक्ष
- अनिल छबिलदास चौधरी - रावेर यावल - प्रहार जनशक्ती पक्ष
- गणेश रमेश निंबाळकर - चांदवड - प्रहार जनशक्ती पक्ष
- सुभाष साबणे - देगलूर बिलोली (SC) - प्रहार जनशक्ती पक्ष
- अंकुश सखाराम कदम - ऐरोली - महाराष्ट्र स्वराज्य पक्ष
- माधव दादाराव देवसरकर - हदगाव हिमायतनगर - महाराष्ट्र स्वराज्य पक्ष
- गोविंदराव सयाजीराव भवर - हिंगोली - महाराष्ट्र राज्य समिती
- वामनराव चटप - राजुरा - स्वतंत्र भारत पक्ष