उद्यान अधीक्षकांना धरले धारेवर

By admin | Published: December 24, 2014 01:27 AM2014-12-24T01:27:38+5:302014-12-24T01:27:38+5:30

महापालिकेच्या उद्यान विभागाच्या कारभाराबद्दल अनेक शंका उपस्थित करत दत्ता साने यांनी उद्यान अधिक्षक सुरेश साळुंखे यांना धारेवर धरले.

Park superintendent caught Dhayrwar | उद्यान अधीक्षकांना धरले धारेवर

उद्यान अधीक्षकांना धरले धारेवर

Next

पिंपरी : महापालिकेच्या उद्यान विभागाच्या कारभाराबद्दल अनेक शंका उपस्थित करत दत्ता साने यांनी उद्यान अधिक्षक सुरेश साळुंखे यांना धारेवर धरले. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर शकुंतला धराडे होत्या.
महापालिका प्रशासनास नगरसेवक साने यांनी उद्यान विभाग विषयक प्रश्न उपस्थित करून लेखी उत्तरे मागवली होती. त्यावर प्रश्नोत्तराचा तास झाला. उद्यानात पाण्याच्या टाकीत बुडून एका बालकाचा मृत्यू झाला. त्यामुळे सुरक्षा व्यवस्थेतील निष्काळजीपणा चव्हाट्यावर आला आहे. उद्यानांमध्ये सुरक्षारक्षक म्हणुन एकाची नेमणूक वास्तव्यास दुसरेच कोणीतरी अशी परिस्थिती आहे. वाटीकेतील रोपांची संख्या झपाट्याने कमी झाली आहे. किती झाडे लावली आणि त्यातील किती जगली, किती रोपे तयार केली याचा काही लेखाजोखा नाही. बांधकाम व्यावसायिकांचे हित जोपासण्याचे काम उद्यान विभागाचे अधिकारी करतात. बांधकाम पूर्णत्वाचा दाखला देण्यापुर्वी उद्यान विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागते. वृक्ष प्राधिकरणाच्या नियमावलीनुसार बांधकाम करताना,वृक्ष लागवड करणे बंधनकारक असते. संबंधित बांधकाम व्यवसायिकांनी वृक्ष लागवड करावी,यासाठी प्रति वृक्ष विशिष्ट रक्कम अनामत रक्कम भरावी, अशी तरतूद आहे. त्यातून उद्यान विभागाने २६ कोटी रूपये उत्पन्न मिळविले आहे. हे उत्पन्न अपेक्षित नव्हते,उद्यान विभागाने बांधकाम व्यवसायिकांकडून वृक्ष लागवड करून घेणे अपकयित होते. असे मुद्दे दता साने तसेच स्वाती साने यांनी उपस्थित केले. या मुद्यावर मंगला कदम तसेच आर एस कुमार यांनीही चर्चा केली.

Web Title: Park superintendent caught Dhayrwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.