पुणे शहरात देखावे पाहायला येणाऱ्या गणेशभक्तांसाठी पार्किंगची सोय
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2022 04:41 PM2022-09-04T16:41:42+5:302022-09-04T16:41:54+5:30
यंदाचा गणेशोत्सव धुमधडाक्यात सुरु
पुणे : गणेशोत्सवात देखावे पाहण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात मध्यवस्तीत येतात. तसेच, गणेश विसर्जनाच्या दिवशीही गर्दी हाेते. या नागरिकांची पार्किंगसाठी वाहतूक पोलिसांनी महापालिका शाळा, खासगी शाळा, सार्वजनिक पार्किंगबाबतच्या ठिकाणांची माहिती दिली आहे. तेथे नागरिकांना आपली वाहने पार्क करण्याची सोय होणार आहे.
४ ते ८ सप्टेंबरदरम्यान पार्किंगची ठिकाणे
बालगंधर्व रंगमंदिर, डेक्कन जिमखाना वाहनतळ, मिलेनियम प्लाझा वाहनतळ, लँडमार्क वाहनतळ, शिरोळे रस्ता, प्रो. यश एंटरप्रायजेस, सर्कस मैदान, न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग, टिळक पूल ते भिडे पूल नदीकिनारी, बालभवनसमोर, सारसबाग रस्ता ते बजाब पुतळा ते सणस पुतळा चौक उजवी बाजू, गाडगीळ पुतळा ते कुंभारवेस चौक, हमालवाडा पार्किंग, गोगटे प्रशाला, एस. पी. कॉलेज, मंगला टॉकीज, काँग्रेस भवन, मनपा भवन पार्किंग, सीईओपी मैदान, पुरम चौक ते हॉटेल विश्व, देसाई कॉलेज.
गणेश विसर्जनाच्या येथे असेल पार्किंगची साेय
गरवारे कॉलेज, डेक्कन एज्युकेशन सोसायटी, काँग्रेस भवन, मनपा भवन पार्किंग, सीओईपी मैदान, मंगला टॉकीज, हमालवाडा पार्किंग, जयंतराव टिळक पूल ते भिडे पूल, नदीपात्राचा रस्ता, आयएलएस लॉ कॉलेज, संजीवनी हॉस्पिटल, जैन हॉस्टेल, गाडगीळ पुतळा ते कुंभारवेस, फर्ग्युसन कॉलेज, आपटे प्रशाला, बीएमसीसी कॉलेज, पुरम चौक ते हॉटेल विश्व रस्त्याच्या डाव्या बाजूस, न्यू इंग्लिश स्कूल.