पुणेकरांची पार्किंगची अडचण सुटली, वाहतूक विभागाकडून रस्त्यावरील दोन्ही बाजूच्या पार्किंगबाबत काढले आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 05:38 PM2021-03-25T17:38:43+5:302021-03-25T17:40:10+5:30
वाहतूक पोलीस विभागाने पार्किंगवरील निर्बंध केले रद्द
पुणे शहरातील वाहतूल व्यवस्था सुरळीत होण्याच्या उद्देशाने पोलिसांच्या वाहतूक विभागाकडून रस्त्याच्या दोन्ही बाजूला पार्किंगची सोय करण्यात आली आहे. शहरात वाहतूक कोंडीची समस्या वाढत चालली आहे. अशा परिस्थितीत नागरिकांना वाहने पार्क करण्यास जागा मिळत नाही. त्यामुळे ते नो पार्किंग मध्ये वाहने लावून दंड भरण्यास कारणीभूत ठरतात. त्या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलीस विभागाने पार्किंगवरील निर्बंध रद्द केले आहेत.
फरासखाना वाहतूक विभागाच्या अंतर्गत कसबा पेठ ते पवळे चौक रस्त्यावर दोन्ही बाजूला पी १, पी २ पार्किंग करण्यात येत आहे. तर अलोकनगरी येथील उर्दू मुलांच्या शाळेसमोर २० मीटर अंतरापर्यंत नो पार्किंग करण्यात येत आहे. खडक वाहतूक पोलीस विभागाच्या अंतर्गत आनंदराव बागवे कमान ते महात्मा फुले स्मारकापर्यंत पी १, पी २ पार्किंग करण्यात येत आहे. कोथरूड वाहतूक विभागाच्या अंतर्गत आनंदनगर चौक ते मयूर कॉलनी डीपी रस्त्याच्या पूर्व बाजूला नो पार्किंग आणि पश्चिम बाजूला समांतर पार्किंग करण्यात येत आहे.