वधू वर भाग ३
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:28 AM2020-12-11T04:28:45+5:302020-12-11T04:28:45+5:30
वैष्णवी जोगळेकर (सोबती ) :लिव्ह इन रिलेशनशिपकरीता मोठ्या प्रमाणावर विचारणा होत आहे. त्यामुळे लग्नसंस्था वेगळेच वळण घेत आहे. बऱ्याच ...
वैष्णवी जोगळेकर (सोबती ) :लिव्ह इन रिलेशनशिपकरीता मोठ्या प्रमाणावर विचारणा होत आहे. त्यामुळे लग्नसंस्था वेगळेच वळण घेत आहे. बऱ्याच तरूणांना विविध धर्मातील विवाहविषयक कायद्यांची माहिती नसते, त्यामुळे नंतर समस्या निर्माण होते. कोरोनाकाळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्यामुळे आता लग्न जमण्याबाबतच अनेकांना चिंता निर्माण झाली आहे. कोरोना झालेल्यांना वेगळ्याच समस्या सतावत आहेत. ................... सुरेश पारख (जैन विवाह केंद्र) : ।जैन समाजाच्या मानसिकतेत मोठा बदल होत असून आंतरशाखीयच नवहे तर आंतरधर्मीय विवाह होत आहेत. इच्छुकांनी ऑनलाईनपेक्षा आपापल्या शहरातील संस्थांना प्राधान्य दिल्यास फसवणूक टळेल. तीन ते पाच हजार रूपये फी वाचवण्यासाठी ऑनलाईनच्या मोहाला बळी पडू नका. ............. विराज तावरे ( मराठा विवाह दरबार) : लग्नाबाबत नको तितक्या अपेक्षा वाढल्याने लग्न जमवणे हे मोठे संकट झाले आहे. मुलीच्या आईचा हस्तक्षेप वाढल्याने गोष्टी घटस्फोटांपर्यंत जात आहेत. लग्न समारंभाबाबत समाजात खोट्या प्रतिष्ठेबाबत संकल्पना असल्याने लग्न जमवण्याचे काम आणखी अवघड होत चालले आहे. सासु, सून, नंणंद यांच्या भांडणात मुलाच्या संसाराचा बळी जात आहे. ............................. विद्यानंद मरळ (साथी वधू वर केंद्र) सध्या हूंडा पध्दत उलट झाली आहे. मुलाकडच्यांना हूंडा द्यावा लागत आहे. लग्न जमवण्यासाठी मोठ्या प्रमाणात मेळावे घेण्याची आवश्यकता आहे. आम्ही दिव्यांग, कमी उत्पन्न गट, गंभीर आजारी यांच्याबाबत सहानुभूती ठेवून मोफत लग्न जमवतो. कर्नाटकातील मुलींबरोबर विवाह लावले जातात मात्र पुढे फसवणूक होत असल्याचे आढळून येत आहे. ........................... गोरख जाधव ( मराठी स्मार्ट जोडीदार) मुला-मुलींसह त्यांच्या आई वडीलांचेही समुपदेशन होणे आवश्यक आहे. आमची शिखर संघटना, श्री गणेश ग्रुपमार्फत आम्ही दरमहा किमान २५ विवाह जमवतो. दर आठवड्याला, आंतरजातीय मेळावे झाल्यास मोठा फायदा होऊ शकतो. ........................... रमेश पाटणकर ( पाटणकर इव्हेंटस): लॉकडॉऊनचा आम्ही सकारात्मक उपयोग करून घेतला आणि अल्पावधीत डीजिटल प्लॅटफॉर्मचा मोठ्या प्रमाणात वापर सुरू केला. ʻओटीटी वेडींगʼ ही संकल्पना रूजल्यामुळे संकटातही चांगला मार्ग निघाला आहे. थोडक्येत लग्नाची संकल्पनाच बदलली आहे. हॉल आणि मुहूर्त या संकल्पना कालबाह्य ठरू लागल्या आहेत. वेडींग मेंटॉर ही संकल्पना रूळल्याने कार्यासह